Ticker

6/recent/ticker-posts

बार्टी मार्फत जिल्हा स्तरावर एमपीएससी कोचिंग सुरू करावी


• सामाजिक कार्यकर्ता ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांची मागणी 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) पुणे मार्फत एलआयसी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सीलेक्शन कमिशन(आयबीपीएस) चे धर्तीवर अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात संघ व राज्य लोकसेवा आयोग परीक्षेचे कोचिंग(शिकवणी वर्ग) सुरू करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांनी केली आहे.
         राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गाचे ५९ जाती असून काही अपवाद वगळता या प्रवर्गातील ७० ते ८० टक्के कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन यापन करीत असून हलाखीचे परिस्थितीत आपल्या पाल्यांना शिक्षण देत आहेत. राज्य किंवा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत प्रावीण्य मिळविण्या इतपत काही विद्यार्थी हुशार असले तरी आर्थिक स्थिती गरिबीची असल्यामुळे मोठ्या शहरात जाऊन कोचिंग लावू शकत नाही. त्यामुळे मागे पडतात. असे सामाजिक कार्यकर्ता ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांचे म्हणणे आहे. 
         अनुसूचित जाती प्रवर्गातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांनी वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असले तरी आर्थिक स्थिती अभावी असमर्थ ठरतात. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रशासनाचे माध्यमातून जनसेवेची संधी उपलब्ध होण्याचे दृष्टीने आयबीपीएस चे धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात संघ व राज्य लोकसेवा आयोग पात्रता परीक्षेचे कोचिंग(शिकवणी वर्ग) सुरू करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता ऍड. सचिन राघोर्ते पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या