कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्यामुळे शहर वासियांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. तसेच शहरातील गटार लाईन व पाइप लाईन करिता रस्त्याचे केलेले खोदकाम दुरुस्त करण्यात यावे. या करिता जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव धनंजय तिरपुडे यांचे नेतृत्वात भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी महिनाभरात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
शहर वासियांना स्वच्छ व शुद्ध जल पुरवठा करण्याचे उदात्त हेतूने महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. पण काम अपूर्ण असल्याने उद्देशपूर्ती झाली नाही. त्यामुळे नगर वासियांना अकारण त्रास सहन करावा लागतो. पाणी पुरवठा योजना तात्काळ क्रियान्वीत करावी. तसेच शहरातील गटार लाईन व पाईप लाईन करिता रस्त्यांचे खोदकाम केलेले आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवरून आवागमन करतांना नागरिकांना अकारण त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नादुरुस्त रस्ते तात्काळ दुरुस्त करावे. या करिता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे यांचे नेतृत्वात मुख्याधिकारी करण चव्हाण यांना निवेदन देण्यात आले, तथा चर्चा करण्यात आली. निवेदनातील समस्यांचे महिनाभऱ्यात निराकरण करण्याचे शिष्टमंडळास त्यांनी आश्वासन दिले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव धनंजय तिरपुडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, माजी नगरसेवक शमीम शेख, युवक काँग्रेस चे कमल साठवणे, पंकज उके, शहर काँग्रेस कमिटी महासचिव चंद्रशेखर बनकर, राजू जानदे, संघदिप डोंगरे, जितेंद्र नेवारे, रवींद्र गजभिये, पंकज उके, नंदा मोगरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या