Ticker

6/recent/ticker-posts

मोटारसायकलची ट्रॅक्टरला धडक, १ ठार १ गंभीर

राज्य महामार्ग क्रमांक ३५३ बोरगाव नहराजवळील घटना

दिघोरी/मोठी पोलिसांत गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- ट्रॅक्टर चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोटारसायकल ला धडक दिल्याने १ इसम ठार तर १ इसम गंभीर जखमी झाल्याची घटना राज्य महामार्ग क्रमांक ३५३ बोरगाव जवळील नहरावर बुधवार(ता.१५ मे) दुपारी १२:३० वाजता दरम्यान घडली. दिघोरी/मोठी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असून मृतकाचे नाव मधुकर वामन हुकरे(६५) रा. दिघोरी/मोठी तर गंभीर जखमीचे नाव नीलकंठ मसा गिरेपुंजे(६६) रा. दिघोरी/मोठी, तालुका लाखांदूर असे आहे. आरोपी ट्रॅक्टर चालकाचे नाव नीलोचंद हरीचंद सोनवाने(४०) रा. बारव्हा, तालुका लाखांदूर असे आहे. पोलिस उपनिरीक्षक अजय मडावी तपास करीत आहेत. 
                    मधुकर हुकरे व नीलकंठ गिरेपुंजे हे बजाज बॉक्सर मोटारसायकल क्रमांक एमएच ३१ एएम ७२२८ ने कामानिमित्त लाखांदूर येथे गेले होते. स्वगावी परत येत असताना राज्य महामार्ग क्रमांक ३५३ सी वरील बोरगाव लगतच्या इटियाडोह कॅनलच्या कच्च्या रस्त्याने येणाऱ्या लाल रंगाचा महिंद्रा ४१५ युवो कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ झेड ३९४१ व ट्रॉली क्रमांक एमएच ३६ एएल ०१६४ चा चालक नीलोचंद सोनवाने याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून मोटारसायकल ला धडक देऊन मधुकर हुकरे याचे मृत्यूस तथा नीलकंठ गिरेपुंजे याला गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाला. घटनास्थळावर उपस्थितांनी अपघाताची सूचना दिघोरी/मोठी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपनिरीक्षक अजय मडावी, पोलिस हवालदार हितेश मडावी, पोलिस नायक छत्रपती ठाकरे घटनास्थळी गेले. मृतक व जखमीला ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविण्यात आले. जखमीवर उपचार सुरू असून मृतदेहाचे उत्तरीय परीक्षण करून मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. सविता चांदेवार यांचे फिर्यादीवरून दिघोरी/मोठी पोलिसांनी ट्रॅक्टर चालका विरोधात अपराध क्रमांक ५०/२०२४ कलम २७९, ३३७, ३३८, ३०४(अ) भादवी तथा मोटारवाहन कायदा सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदास धंदर यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अजय मडावी तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या