रुपाली मेश्राम चित्रा न्युज
भंडारा :-विश्वाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम दि. २३ मे २०२४ ला लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर ता. जि. भंडारा च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला योगेश मेश्राम व प्रभूदास निकोसे यांनी पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली. यावेळी वंदनीय भिक्षूणी धम्मसुमना यांनी सामुहिक त्रिशरण, पंचशील, त्रिरत्न वंदना बुद्ध, धम्म, संघ वंदना, जयमंगल गाथा घेतली. यानंतर उपस्थितांना धम्म देसना देण्यात आली. तदनंतर बोधी वृक्षांचे संवर्धन करून विधीवत पुजा करण्यात आली. कार्यक्रमास बौद्ध बांधव तसेच परिसरातील सर्व नागरिक व बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमास मा. अरविंद बाभूळे सदस्य ग्रा. पं. भोजापूर, मा. नरेंद्र गणविर प्राचार्य नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.), प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे एन. जे. पटेल कॉलेज मोहाडी, प्रा. डॉ. विजय गणविर आर्ट अँड कामर्स महाविद्यालय पेट्रोलपंप (ठाणा), डॉ. दिलीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी नेहरू नगर परिसरातील वर्ग १० वी व १२ वी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वर्ग १० वी सीबीएसई बोर्ड परीक्षेत निसर्गा ऋषी गोस्वामी ९१.२०% तर स्टेट बोर्ड वर्ग १२ वी परीक्षेत क्षितीजा ऋषी गोस्वामी ६१.००% गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्यामुळे पुष्पगुच्छ व मेडल, भेट वस्तू, पेन देवून भिक्षूणी धम्मसुमना यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ऋषी गोस्वामी, नितेश धारगावे, सुरेंद्र मेश्राम, नंदकिशोर भालाधरे, वर्षा गणविर, अस्मिता धारगावे, स्नेहलता मडामे, राहूल दहीवले, देवेंद्र धारगावे, दिपक मेश्राम, विनोद कोल्हे, रत्नघोष भालाधरे, प्रभूदास निकोसे, रुपलता गणविर, सुजाता गोस्वामी, राखी रंगारी, मृणाली कान्हेकर, अंकिता मेश्राम, चंदा लांजेवार, नागसेन लांजेवार, अश्विनी बाभूळे, सपना मेश्राम, कल्पना नागवंशी, जावेद खान (पठाण), योगेश बोरकर, मार्कंड मेश्राम, दिपक मेश्राम, प्रमोदिनी भालाधरे, ज्योत्सना मेश्राम उपस्थित होते. आयुष, अंकुर, आदित्य, रूतूजा गणविर, स्नेहांश कान्हेकर, उर्वशी, सिध्दांत, सौरभ मेश्राम, अदिती धारगावे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन धम्मानंद रंगारी यांनी केले. भोजनदान व खीरदाना नंतर कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या