Ticker

6/recent/ticker-posts

तुमसरात २६ मे ला भिख्खू संघातर्फे धम्मदेशना व धम्म रैली चे आयोजन



संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा :- तुमसर शहरात प्रथमतःच  संयुक्त बुद्ध जयंती साजरी करण्यात येणार असून भिख्खू संघातर्फे  शांततेत धम्मदेशना रैली चे ही भव्य आयोजन करण्यात आले आहे.
तुमसर शहरात  संयुक्त बुद्ध जयंती रविवार, 26 मे 2024 रोजी साजरी होत आहे. तिहेरी पवित्र वैशाख पौर्णिमेच्या दिवशी, सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झाला, त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि महापरिनिर्वाण प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी ४५ वर्षे मानव कल्याणासाठी धम्माचा प्रचार व प्रसार केला. समानता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व आणि न्याय यावर आधारित एक आदर्श संघ निर्माण केला. माणसाला सुख, शांती आणि निर्वाणाचा मार्ग दाखवून त्यांनी समस्त मानवजातीला दु:खापासून मुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संयुक्त बुद्ध जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे   भिख्खू संघातर्फे रविवारला दु ३ ते ६ धम्मदेशना व  सायं.६ वाजे पासुन शांतेत धम्म रैली चे आयोजन करण्यात आले आहे. सदर  कार्यात उपासक  उपासिकानी मोठ्या संख्येने पोहोचून कार्यक्षम कार्य करण्याची संधी मिळवा आणि तन, मन आणि धनाने सहकार्य करण्याचे आव्हान संयोजका ने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या