• लाखनी शेतशिवारातील घटना
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- काम आटोपून दुचाकीने लाखनी कडून स्वगावी धानला येथे जात असतांना जात असताना दुचाकी स्लीप होऊन चालक रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी(ता.२३मे ) रात्री ९:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृतकाचे नाव श्रीकृष्ण खुशाल ईश्वरकर(५५) रा. धानला/चान्ना, तालुका लाखनी असे आहे.
श्रीकृष्ण ईश्वरकर हा आपले दुचाकीने कामानिमित्त लाखनीला आला उशिरा काम आटोपल्याने तो गावाकडे जात असताना लाखनी शेतशिवारात दुचाकी स्लीप झाल्याने डांबरी रस्त्यावर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी त्याला लाखनी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याचेवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे पाठविण्यात आले. डोक्याला खोलवर असल्यामुळे उपचारादरम्यान शुक्रवार(ता.२४) सकाळी ६:०० वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने घटनेची माहिती नागपूर पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी आले. सर्व सोपस्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी पाठविण्यात आला. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे मृत्यू पश्चात पत्नी, ४ मुली, जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे. श्रीकृष्ण च्या अकाली निधनाने गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या