Ticker

6/recent/ticker-posts

साकोलीतील रमाबाई चौकात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण

 
संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा :- साकोलीतील रमाबाई चौकात विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध ,डॉ बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाचे उद्घाटन शिवकुमार गणवीर यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डी ई रामटेके होते . प्रमुख अतिथी म्हणून अश्विन नशिने, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, अशोक रंगारी, इंजिनिअर महेद्र मेश्राम ,चंदन मेश्राम , दिपक साखरे,भावेश कोटागले , अमोल टेंभुर्णे, ओम गायकवाड, पुना कांबळे,इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत याप्रसंगी डी जी रंगारी ,अशोक रंगारी, अश्विन नसिने, डी ई रामटेके ,चंदन मेश्राम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांचे विचार जनतेमध्ये रुजवून समाजाची कसे प्रगती करता येईल व त्यांचे विचार कसे आचरणात आणता येईल याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
  कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक ज्योती काणेकर मॅडम यांनी केले तर आभार भावे सर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन कुमार रामटेके ,शीलादेवी,वासनिक, सुनंदा रामटेके , चव्हाण,   व रमाई बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली व रात्रीला सर्वांना भोजनदान देण्यात आले विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या