मा. पोलीस अधीक्षक, जी. श्रीचर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर सराईत गुन्हेगारा बाबत एमपीडीए अंतर्गत सलग ४० वी कार्यवाही,
मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-मा. पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली यांनी जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भूमिका घेवून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इत्यंभूत माहिती काढून ते करत असलेल्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रक्रीया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.
धोकादायक इसम नामे श्री देवानंद ऊर्फ सोनु पिता शिवाजी जाधव वय २३ वर्ष व्यवसाय डि.जे. चालक रा. सिध्दार्थनगर, जवळा पळशी रोड हिंगोली ता.जि. हिंगोली यांचेवर मागील अनेक वर्षांपासून हिंगोली
जिल्हयातील पो.स्टे. हिंगोली ग्रामीण, जि. हिंगोली येथे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे एकूण सात (०७) गुन्हे दाखल असुन तो सतत गुन्हे करीत होता. तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्याचे कृत्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भित्ती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक इसम बनला होता. म्हणुन मा. पोलीस अधीक्षक, यांचे आदेशाने सदर प्रकरण एन.बी. पाडळकर, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. हिंगोली शहर ता.जि. हिंगोली यांनी एस.एस. दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग हिंगोली ग्रामीण अतिरीक्त पदभार हिंगोली शहर यांच्या मार्फतीने नमुद इसमा विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबतचा अधिनियम १९८१ (एम.पी.डी.ए.) चे कलम ३ (१) अन्वये कार्यवाहोचा प्रस्ताव मा.पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांच्या कडे सादर केला होता. मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या कडे पाठविला होता.
मा. जिल्हाधिकारी, हिंगोली जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करुन नमुद धोकादायक इसम नामे श्री देवानंद ऊर्फ सोनु पिता शिवाजी जाधव वय २३ वर्ष व्यवसाय डि.जे. चालक रा. सिध्दार्थनगर, जवळा पळशी रोड हिंगोली ता. जि. हिंगोली हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरुन धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्यास एम.पी.डी.ए. १९८१ (सुधारणा १९९६, २००९ आणि २०१५) कलम ३ (२) अन्वये एक वर्षाकरीता कारागृहात स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असुन पुढील कार्यवाही सुरु आहे.


0 टिप्पण्या