Ticker

6/recent/ticker-posts

साकोली येथे प्रबोधनात्मक कव्वालीचे आयोजन


रवी भोंगाने साकोली 
साकोली:- स्वाभिमानी सामाजिक संघटना, भीम सेना यांच्या संयुक्त विद्यमाने  साकोली येथे २३ मे २०२४ रोजी साय.६ वाजता प्रबोधनात्मक कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे. वैशाख बुद्ध पोर्णिमे निमित्ताने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बुद्ध विहार एकोडी रोड साकोली येथे संगीतमय प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष करणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र ठाकरे मॅनेजिंग डायरेक्टर शुभमहालक्ष्मी  उपस्थित राहणार आहेत. साकोली परिसरातील सर्व बुद्ध उपासक उपसिका व सर्व बहुजन बांधवांनी या प्रबोधनात्मक कव्वाली आस्वाद घ्यावा असे आवाहन भीम सेना अध्यक्ष धम्मा वासनिक, शुभम राऊत, भावेश कोटांगले, कुलदीप राऊत, विक्की नंदेश्वर, सौरभ राऊत, रक्षित कांबळे, मोहित कराळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या