हरदीप सिंग बावरी परभणी
परभणी :-अखंड जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दिनांक 23 मे रोजी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी च्या वतीने जिल्हा कार्यालय डॉ. आंबेडकर नगर आय. टी. आय. कॉर्नर येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी तथागत भगवान गौतम बुध्द व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे महाराष्ट्र संघटक तथा संपर्क प्रमुख भगीरथ बद्दर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले होते. यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्र संघटक तथा संपर्क प्रमुख भगीरथ बद्दर, परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, परभणी जिल्हा सचिव तथा परभणी जिल्हा कार्याध्यक्ष दयावान सरकार प्रमोद अंभोरे, रुग्णहक्क संरक्षण समिती चे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, विश्वकर्मा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाष पांचाळ, समाजहित अभियान प्रतिष्ठान चे सदस्य शंकर बनसोडे, विनोद वाडेकर, शहीद वीर भगत सिंग मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी आदींची उपस्थिती होती. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त लोक स्वतंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले आहेत.


0 टिप्पण्या