Ticker

6/recent/ticker-posts

डायल ११२ हा नंबर अत्यावश्यक सेवेसाठी आहे का ; पोलीसांनाच मामा बनविणा-या देशप्रेमींच्या करमणुकीसाठी.

विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-शासनाच्या होम विभागाने अत्यंत म्हत्वाच्या कामांसाठी समाजातील सामान्यातील सामान्य व्यक्ती आपली समस्या पोलीसांकडे फोनवरुन मांडू शकतात.यासाठी डायल ११२ ही सेवा सुरु केली आहे.आणी वाढवणा ता.उदगीर पो.स्टे. व हंडरगुळी चौकी अंतर्गत येणा-या बहूतांश गावातील गरजवंत लोकांऐवजी "देशप्रेमी" दारु च्या नशेत या नंबरवर फोन करुन हकनाक पोलीसांना कामाला लावत असल्याचे समजते.यामुळे हा डायल ११२ नंबर पोलीसांसाठी "हेडॅक" तर "देशप्रेमीं" साठी करमणुकीचे साधन बनले असुन,गत कांही दिवसापासुन हाळी व भागातील कांही "देशप्रेमी" / दारुडे लोकं हा नंबर डायल करुन सं. पोलीसांना वेळी-अवेळी ञास देतात. तरी पण "देशी"च्या धुंदीत काॅल ११२ ला केला असे म्हणत देशप्रेमींना कसलीच कारवाही न करता सोडून देतात.व खाकीवर्दीच्या आत पण 1 माणुस असतो.याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.माञ पोलीसांनी मानवते च्या नजरेतून दारुड्यावर कारवाही न करुन चुक केली.याचा ही अनुभव पोलीसांसह जनतेला आला आहे.तरी आगामी काळात हकनाक ११२ वर काॅल करुन पोलीस "दादांना" "मामा" बनविणा-यांना "सुंदरी" चा "प्रसाद" देणे गरजेचे आहे.असे जाणकार मंडळीत बोलले जात आहे.
मा.सोमय मुंडे,डाॅ.अजय देवरे आणी बी.सी.रेड्डी,नवदीप अग्रवाल असे हे आयपीएस व जाॅंबाज अधिकारी लातुरच्या पोलिस दलात दाखल झाले तसे गुन्हे व अवैध धंदे ब-याचअंशी थंडावले आहेत.माञ कुठेतरी एखादी गंभीर घटना घडते.व अशा अत्यंत आपतकालीन वेळेस डायल _११२ हा नंबर वरिष्ठ पातळीवरुन उप्लब्ध केला असलातरीही हा नंबर वापरणे गरजवंताने जरुरी आहे.माञ ख-या गरजवंताऐवजी तसेच एखाद्या गंभीर प्रकरणा ऐवजी ११२ या नंबरवर दारु,गांजा पिऊन पतीने मारले.अशी तक्रार करणा-या महिला प्रत्यक्षात लेखी द्यायला तयार होत नाहीत.याचा तसेच "देशप्रेमी" चा नशेत सदा काॅल येत असतो.आणी नशेत कायबाय बोलत असतात.अशा प्रकारचा अनुभव घेणा-या पोलीसांना हा एक प्रकारे टेंन्शन देण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.अगोदरच अनेक प्रकारच्या कामांचा डोंगर असल्याने पोलीसांची मानसिकता टेंन्शन मध्ये दिसते.त्यात डायल ११२ वर आलेला काॅल रिसिव्ह करणे व याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना तत्काळ देणे बंधनकारक असते.माञ दारुच्या नशेत काॅल करुन पोलीसांना मामा बनविणा-या व हेडॅक देणा-यांवर आता तरी वाढवणा पोलीस कारवाई करतील का?असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या