Ticker

6/recent/ticker-posts

पुन्हा एकदा गरमा "गरम' ! ; शहराचा पारा ४१ पार

 रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर:- पूर्वमौसमी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून दिलासादायी वातावरण असलेले छत्रपती संभाजीनगर शहर मंगळवारी,  २२ रोजी पुन्हा एकदा तापले. शहराचे तापमान तब्बल ४१. ६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले. अवकाळी पावसाने दिलासा मिळालेले  संभाजीनगरकर यामुळे पुन्हा कमालीच्या उकाड्याने हैरान झाले आहेत.

मान्सूनने अंदमान बेटांवर धडक दिल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही पडायला सुरुवात झाली आहे. मात्र त्याआधी उन्हाचा चटका वाढल्याने हवेत अनपेक्षित बदल झाले आणि अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी दिली. छत्रपती संभाजीनगरातही पावसाने सुखद वातावरण निर्माण केले. उन्हाने होरपळणाऱ्या जनतेला या अवकाळीच्या सरींनी मोठा दिलासा दिला. मात्र मंगळवार २० रोजी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी दिल्याने जमिनीतील वाफ बाहेर पडून पुन्हा एकदा वातावरणात उष्णता वाढीस लागली. परिणामी शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाली.

चिखलठाण वेधशाळेने घेतलेल्या नोंदीनुसार मंगळवारी शहराचे तापमान ४१. ६ अंश नोंदवले गेले आहे. याआधी ६ मे रोजी ४१. २ अंशापर्यंत तापमान पोहोचले होते. त्यानंतर प्रथमच तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. ६ मे नंतर सोमवार २० मे पर्यंत तापमान ४० ते ३५ अंशादरम्यान खेळते होते.

दरम्यान, या उकाड्याने शहरवासीय मंगळवारी घामाघूम झाल्याचे दिसून आले. सकाळापासूनच सूर्याचा चटका जाणवत होता. आकाशात कुठेही ढग दिसून आले नाही. यामुळे सायंकाळी ५ पर्यंत वातावरणात उष्णता कायम होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या