१ सप्टेंबरला चंद्रपूरहून ‘विदर्भ पंढरी पारडी’ला प्रस्थान
चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : अखंड परिवार यांच्या वतीने गोकुळ अष्टमी भव्य यात्रेनिमित्त ‘पायदळ दर्शन वारी - विदर्भ पंढरी पारडी’चे आयोजन करण्यात आले आहे. ही वारी दि. १ सप्टेंबर २०२६, मंगळवार रोजी सकाळी ९.०० वाजता श्री. संत नगाजी महाराज मंदिर, समाधी वार्ड, चंद्रपूर येथून प्रस्थान करणार आहे. वारीचा समारोप ६ सप्टेंबर २०२६, रविवार रोजी केळी, ता. साओली येथे होणार आहे.
प्रचारक, प्रसारक व सेवक अखंड परिवार यांच्या मार्गदर्शनातून ही पाचवी वर्षातील वारी काढण्यात येत आहे.
वारीचा मार्ग व मुक्काम
६ दिवस चालणाऱ्या या वारीत दररोज मुक्काम व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ता. १/९/२०२६ मंगळवार - पहिला मुक्काम घोडपेठ निवास: श्री. सार्वजनिक हनुमान मंदिर, घोडपेठ. भोजन: नाभिक समाज घोडपेठ,ता. २/९/२०२६ बुधवार - दुसरा मुक्काम भद्रावती निवास: श्री. संत नगाजी महाराज मंदिर, भद्रावती. भोजन: श्री. संजयराब अतकरे व नगाजी महाराज भक्त परिवार, ता. ३/९/२०२६ गुरुवार - तिसरा मुक्काम नंदोरी निवास व भोजन: जगन्नाथ बाबा मठ कमिटी व नाभिक समाज नंदोरी, ता. ४/९/२०२६ शुक्रवार - चौथा मुक्काम वनोजा निवास: तुकडोजी महाराज प्रार्थना भवन, वनोजा. भोजन: श्री. कमलाबाई सर्पंच व इतर मान्यवर ता. ५/९/२०२६ शनिवार - पाचवा मुक्काम माडेली निवास: विठ्ठल रुक्मिणी मंदिर, माढेळी भोजन: बंडुजी वाटकर व नगाजी महाराज भक्त परिवार, ता. ६/९/२०२६ रविवार - सहावा मुक्काम केळी निवास व भोजन: तानबाजी महल्ले व नगाजी महाराज भक्त परिवार. येथून वारी पारडीसाठी रवाना होणार आहे.
आयोजकांनी वारकऱ्यांसाठी काही नियम दिले आहेत. वारीत व्यसन, भांडण, राजकीय चर्चा, महिला पुरुष असभ्य वर्तनास मनाई आहे. विमा स्वतःची जबाबदारीवर राहील. सोबत आरामाचे कपडे आणावेत. यावर्षी महिलाही सहभागी होऊ शकतात.
संपर्क
अधिक माहितीसाठी अखंड परिवाराच्या पुढील क्रमांकांवर संपर्क साधता येईल:
चंद्रपूर - ७५०७०६१९२, ९८२३५५८७४३, १७६७८९४५३४, ९७६७३६८९५३
राजुरा - ९४२१९२११२७, सुरगाव वर्धा - ८००७७०२६१९, चूरू - ९८७६७६७९, वणी - ८५२०८७४८७
आयोजक : अखंड परिवार
----------------------------------------------------
चंद्रपूरहून १ सप्टेंबरला विदर्भ पंढरी पारडी वारी
अखंड परिवार आयोजित ६ दिवसीय पायदळ वारी घोडपेठ, भद्रावती, नंदोरी, वनोजा, माडेली मार्गे ६ सप्टेंबरला केळी येथे समाप्त. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन


0 टिप्पण्या