Ticker

6/recent/ticker-posts

शेतकर्‍यांची विमा फसवणूक करणार्‍या सेतु सुविधा केंद्र चालकाची होणार चौकशी


तहसिलदारांनी दिले चौकशीचे आश्वासन


सचिन चौरसिया चित्रा न्युज 

रामटेक:- सेतूसुविधा केद्र चालकाने दुर्लक्षामुळे शेतकर्‍यांच्या पीक विमा काढल्याचा प्रकार उजेडास आला आहे. संतप्त शेतकर्‍यांनी या प्रकरणी तक्रार केली असुन सेतु चालकावर तहसिलदार चौकसी करणार काय ?
माहीती नुसार १ रुपयात पीक विमा मिळत असल्याने शेतकरी खूश होते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणाऱ्या सेतू केंद्र चालकाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकरी पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले, त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागले. नगरधन येथील रहिवासी मोहित इखार, धनराज इखार आणि शोभा इखार यांसारख्या अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १ रुपयात नोंदणी केली होती.
दि.२७ व २८ नोव्हेंबर २०२३ ला त्यांच्या शेतात अवकाळी पावसाने धान पिकाचे नुकसान झाले होते. यासाठी त्यांनी नोंदणीसाठी सेतू केंद्राचे चालक राहुल इखार यांच्याशी संपर्क साधला. व त्यांनी नुकसान भरपाई क्लेम करून दिले. त्यासाठी त्यांनी ८०० रुपये प्रति शेतकरी शुल्कही घेतले, परंतु सेतू ऑपरेटरने पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याने शेतकरी २ लाख ५० हजार रुपयांपासून वंचित राहिले. याबाबत ३ मे रोजी रामटेक तहसीलदार रमेश कोळपे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र १७ दिवसांहून अधिक काळ लोटला तरी रामटेक तहसीलदारांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
याबाबत रामटेक येथील तहसीलदार रमेश कोळापे यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या