विजय चौडेकर चित्रा न्यूज,
नांदेड :-पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 14 जून पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतु या कालावधीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
🌧️ म्हणजेच राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. उर्वरित राज्यात मात्र खूप मोठा पाऊस पडणार नाही. तसेच 15 ते 16 जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते.
त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. साधारणता 18 जून नंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी वर्तवला आहे. आता महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे मात्र शेतकऱ्यांनी किमान सहा इंच ओल गेल्यानंतरच पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन ही पंजाबरावांनी यावेळी केले आहे.
🌱 पेरणीचा निर्णय घाई घाईने घेऊ नये अन्यथा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते असा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे. मनसोक्त अन पेरणीयोग्य पाऊस झाला की मगच पेरणीचा निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार नाही.


0 टिप्पण्या