🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - १ जुलै
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
भा. रा. १० आषाढ १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : ग्रीष्म
मास: ज्येष्ठ
पक्ष: कृष्ण
तिथी: दशमी (१०.२५) ~ एकादशी
वार : सोमवार
नक्षत्र : अश्विनी (०६.२५) ~ भरणी
राशी : मेष
*जागतिक सहकार दिन*
*भारतीय वैद्य दिन (Doctor's Day)*
*महाराष्ट्र कृषि दिन*
*भारतीय स्टेट बैंक स्थापना दिवस*
https://shivray.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87/
१६९३: छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नावजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला. *गड आला व सिंहही आला!*
अधिक माहितीसाठी वर दिलेला दुवा पहा.
१८३७: जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
१८७४: पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.
१८७९: भारतात पोस्टकार्ड बाजारात विक्रीस उपलब्ध झाली.
१८८१: जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फोन कॉल कॅनडा मधून अमेरिकेत करण्यात आला.
१९०८: एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
१९०९: क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.
१९१९ : कै. बाबूराव ठाकूर यांच्या ’तरुण भारत’ (बेळगाव) या वृत्तपत्राची सुरूवात झाली.
१९३४: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
१९४८: बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या पूना मर्चंट्स चेंबर या संस्थेची स्थापना झाली.
१९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकेचे नाव इंपिरिअल बँक होते.
१९६३: अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.
१९६४: भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना झाली.
१९७५: भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २० सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली.
१९९१: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.
२००१ : फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
२००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.
२०१५: डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
२०१७: देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण सुधारणा म्हणून वस्तू व सेवाकर (जीएसटी) संपूर्ण भारतात लागू करण्यात आला.
जन्मदिवस
१८८२: डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य.
१९१३: महाराष्ट्राचे ३ रे मुख्यमंत्री वसंतराव नाईक
१९३८: प्रख्यात भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील महान बांसुरी वादक, संगीत दिग्दर्शक आणि थोर शास्त्रीय कलाकार पंडित हरिप्रसाद चौरसिया
१९४९: भारताचे १३वे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू
१९६१: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला
१९७३: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तसंच, उत्तरप्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव.
मृत्यूदिन
१८६०: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर
१९३८: गणेश श्रीकृष्ण तथा दादासाहेब खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्हाडचे नबाब’.
१९६२: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन
१९६२: भारतरत्न पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय.
१९६९: कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर.
१९८९: कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील. ’माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ’देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ’डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत.
*।। दास-वाणी ।।*
आपण भ्रमें लाहानाळला ।
केवळ देहधारी जाला ।
तरी मग ब्रह्मांड त्याला ।
कवळेल कैसें ।।
वृत्ती ऐसी वाढवावी ।
पसरून नाहींच करावी ।
पूर्णब्रह्मास पुरवावी ।
चहूकडे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०९/०९/३४-३५
मी देह असे मानणे, देहाशी निगडीत देहबुद्धीचे संवर्धन करणे, देहाशीच तादात्म्य पावणे हा भ्रम बाळगल्यामुळे जीवात्मा देहाइतकाच होतो. देहापलीकडे त्याला काहीच दिसत नसल्याने तो संकोचित होतो. याला लाहानाळला असे म्हटलय. मग त्या जीवात्म्याला ब्रह्मांडाची व्यापकता कशी आत्मसात करता येईल?
साधनेने अंत:करणवृत्ती इतकी सूक्ष्म करत करत न्यावी की ती सर्वव्यापी व्हावी.
जितके सूक्ष्म तितके व्यापक हे तत्व लक्षात घेता वृत्ती तरल होत होत नाहीशी करावी. पूर्णब्रह्मास पुरवावी म्हणजे अंत:करणवृत्ती नि:संदेह करून सर्वव्यापी ब्रह्माएवढी करावी.
हाच मोक्ष होय.,
*संदेहवारण समास.*
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या