विद्यार्थी, पालक, प्रवाशी नागरिकांची मागणी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- गाव तिथे बस "प्रवाशांच्या सेवेसाठी" हे ब्रीद घेऊन सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे साकोली आगार अंतर्गत साकोली ते लाखनी मार्गे निलागोंदी बसफेरी सुरू करावी. अशा आशयाचे पत्र भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी साकोली आगार वाहतूक नियंत्रकांना दिले होते.वाहतूक नियंत्रकाच्या दुर्लक्षितपणामुळे साकोली ते सालेभाटा मार्गे निलागोंदी ही बसफेरी लाखनी पर्यत सुरू करावी. अशी मागणी माजी खासदारांसह विद्यार्थी, पालक व प्रवासी करू लागले आहेत.
साकोली व लाखनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्व प्रकारच्या विभागाचे शासकीय कार्यालये असून ग्रामीण भागाला जोडणारे केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे गुढरी, निलागोंदी, कीन्ही/एकोडी, मुंडीपार, सिंदीपार, मोरगाव, राजेगाव, सालेभाटा, मासलमेंटा, लाखोरी या मार्गानी बस जात नसल्याने ग्रामीण परिसरातील जनतेची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. साकोली व लाखनी हे शैक्षणिक केंद्र असल्यामुळे या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, याशिवाय कला, वाणिज्य व विज्ञान विषयाचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण आणि इतरही अनेक अभ्यासक्रम व तांत्रिक शिक्षणाची सोय असल्यामुळे साकोली आगाराची लाखनी पर्यत सकाळी 7:00, 12:00 व सायंकाळी 4:00 वाजता या वेळेत बसफेरी सुरू करावी. अशी मागणी या परिसरातील विद्यार्थ्यांसह जनतेकडून होत आहेत.
*ज्येष्ठ नागरिक योजनेपासून वंचित(चौकट)*
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना पास ची सवलत, परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना पास ची सवलत, महिलांसह 65 वर्षांवरील पुरुषांना अर्धी तिकीट तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना निःशुल्क प्रवासाची सुविधा दिली आहे. या सुविधेपासून निलागोंदी-सालेभाटा मार्गावरील पात्र लाभार्थी मुकत आहेत.
गरीब विद्यार्थी शिक्षणास मुकणार?
निलागोंदी व सालेभाटा परिसरात भूमिहीन व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक असल्यामुळे इच्छा असूनही होतकरू उच्च शिक्षण घेता येत नाही. गरीब विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता साकोली ते लाखनी बसफेरी सुरू करणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या