मोईन कादरी हिंगोली
हिंगोली:-मा. पोलीस अधीक्षक हिंगोली . जी. श्रीधर यांचे आदेशाने हिंगोली जिल्हयात अवैद्य धंदे विरूध्द विशेष मोहीम राबविण्यात येत असुन दिनांक २७/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदार यांचेकडुन माहीती मिळाली कि, प्रॉपर हिंगोली शहरातील तोफखाना भागात सयद अनवर हुसेन उर्फ हाजी व फैजान, रा. आजमकॉलनी, हिंगोली हे सरकारी दवाखाना जवळ तोफखाना, हिंगोली परिसरात वलीभाई याच्या पत्राच्या शटरमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा व पान मसाला तंबाखु विक्री करणेकामी साठवलेला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस पथक घटनास्थळावर पोहचण्यापुर्वीच फरार झाले. सदर ठिकाणावरून महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला एकुण १,१६,१४०/- रूपये किंमतीचा विमल पान मसाला, राजनिवास सुगंधित पानमसाला, सुगंधीत व्हि-१ बिग तबाखु, प्रिमियम राजनिवास सुगंधीत पान मसाला, गोवा १००० गुटखा मिळून आल्याने सदर दोन्ही आरोपींविरूध्द पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पो.नि. विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, दिलीप बांगर, रविना घुमनर यांनी केली आहे.


0 टिप्पण्या