Ticker

6/recent/ticker-posts

मागासवर्गीयांचे जागेत शौचालय बांधकाम करणे आले अंगलट

• ४ इसमांवर ॲक्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल 

• केसलवाडा/कातूर्ली येथील घटना 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- आमचे मालकीचे शेतजमिनीच्या धुऱ्यावर शौचालय बांधकाम का करतो. अशी विचारणा केली असता जातीवाचक शिवीगाळ करून स्त्री चे लज्जेस बाधा पोहचेल. असे हातवारे करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अड्याळ पोलिसांत विविध कलामांसह ॲक्ट्रासिटी अंतर्गत ४ इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अनिल ताराचंद तवाडे(४२), ताराचंद सखाराम तवाडे(६०), निर्मला ताराचंद तवाडे(५०) सरिता अनिल तवाडे(३०) सर्व रा. केसलवाडा/कातूर्ली, तालुका पवनी तर फिर्यादी महिलेचे नाव अनु बंडू गजभिये(६२) रा. केसलवाडा/कातूर्ली असे आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी पवनी तपास करीत आहेत. 
                      केसलवाडा शेतशिवारात पिडीत महिलेच्या वडिलांची सव्वा एकर शेतजमीन असून मागील ४० वर्षापासून पिडीत महिला पेरणी करते. शेतालगत आरोपीचे घर असून २ महिन्यापूर्वी अनिल तवाडे याने पीडितेच्या धुऱ्यावरील बोरीचे तीन झाडे तोडून धुऱ्यावर शौचालयाचे बांधकाम करीत आहेत. बांधकामाचे साहित्य तथा शेतीचे साहित्य त्याने पिडितेच्या शेतात ठेवले आहे. त्याला बांधकाम बंद करण्यास हटकले असता भांडण केले. त्यामुळे पिडीतेने बहिणीला बोलाविले. गुरुवारी(ता.६जून) दुपारी ४:३० वाजता फिर्यादी व तिची बहीण रेखा सुरचंद सुखदेवे शेतावर गेले असता अनिल तवाडे हा शौचालयाचे बांधकाम करीत होता. त्याला माझे धुऱ्यावरील तुझ्या शौचालयाचे बांधकाम दुसऱ्या जागी कर. हा धुरा माझा आहे असे बोलली. तेव्हा पिडीतेची बहीण धुऱ्यावरून खाली कॉलमचे खड्ड्यात उभी झाली व ही जागा आमची आहे. असे त्यास सांगितले असता त्याने तिला विट घेऊन मारण्यास धावला व धक्का दिल्याने धुऱ्यावरील बांधलेली भिंत खचली असता ताराचंद तवाडे, निर्मला तवाडे व सरिता तवाडे यांनी भांडण करून शिवीगाळ केली. तर अनिल तवाडे याने तू आपले बहिणीला कशाला बोलावलीस असे बोलून जातीवाचक अपशब्द बोलून स्त्रीला लज्जास्पद होईल. असे हातवारे करून बांधकामावरील पावडा घेऊन मारण्यास धावला पण लागला नाही. अनिल तवाडे याने मी तुझ्या बांधीत बांधकाम करीन. तू रोकटोक केलीस तर तुला व तुझ्या बहिणीला जीवाने मारीन. अशी धमकी दिल्याने पिडीतेसह तिच्या बहिणीच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे फिर्यादी वरून अड्याळ पोलिसांनी अनिल तवाडे, ताराचंद तवाडे, निर्मला तवाडे, सरिता तवाडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून कलम २९४, ३२३, ५०९, ५०६, ३४ भादवी तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सहकलम ३(२)(व्हीए), ३(१)(आर) अन्वये उपविभागीय पोलिस अधिकारी पवनी तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या