राजेश येसेकर भद्रावती
भद्रावती : विदर्भवादी ओबिसी नेते उच्च विद्याविभूषित, स्वच्छ प्रतिमा प्रमाणिक बहुजन चेहरा, ओबिसींचे सक्षम नेतृत्व व प्रदेश उपाध्यक्ष - भाजपा ओबिसी मोर्चा महाराष्ट्र डॉ. अशोक जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि. ११ जुन रोज मंगळवारला जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे दिवसभरात विविध कार्यक्रमामध्ये डॉ. अशोक जिवतोडे यांच्या वजनाच्या भारोभार अन्नधान्य वृद्धाश्रमात वाटप करण्यात आले. रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आले. सोबतच चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेत शेतकरी आत्महत्याग्रस्त, पूरग्रस्त, कोविड- १९ ने मृत झालेल्या पालकांच्या पाल्यांना नि:शुल्क प्रवेश , गरीब गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य, पुस्तक भेट व नि: शुल्क प्रवेश महाविद्यालय परीसरात वृक्षारोपण ईत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
डॉ. अशोक जिवतोडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जिवनाची यशस्वी वाटचाल अशिच सुरू राहो, यांच्या माध्यमातून विदर्भ विकास, ओबीसी समाजाचे कार्य व बहुजन समाजाची सेवा घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. शुभेच्छांसाठी यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरीक तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील आजारी रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले होते.
यावेळी भद्रावती येथील धनराज पा. आस्वले, पुरुषोत्तम पा. मत्ते, बाबा तराळे, प्रा. रविकांत वरारकर,अविनाश पोहनकर सर, पिंपळकर काकाजी , घोसरे सर, पप्पु वानखेडे सर, अन्नाजी खुटेमाटे, भाऊराव पा. खुटेमाटे गुरुजी, सचिन नक्षिणे, नितीन खरवडे सर, उमाटे सर, हरीश घुमे, संदीप गोखरे,जित्तु पारखी, राकेश खुसपुरे, अमोल नागपुरे, राजु ताजणे व दिपक कावटी आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या