Ticker

6/recent/ticker-posts

कुंभली येथे बसचा अपघात


रवी भोंगाने साकोली 
साकोली :-साकोली जवळ असलेल्या कुंभली येथील मार्तंड खोटेले यांच्या घराजवळ चंद्रपूर वरून साकोली कडे येणारी बस अनियत्रित झाल्याने मार्तंड खोटेले कुंभली यांच्या घराला जाऊन आदळली. त्यामध्ये त्यांच्या दुकानातील नुकसान झाले. बस मधील ४ लोक जखमी झाले.यात उमराव मेश्राम सोनमाळा ,सत्तेशीला कांबळे बोरगाव , सुरज साखरे बोदरा , श्रद्धानंद सनीचरे तुमसर यांचा समावेश आहे. त्यांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. यापैकी सदानंद सनिचरे तुमसर व सत्तेशीला कांबळे यांना भंडारा येथे रवाना करण्यात आले.  ही घटना दुपारी ४ वाजता घडली .साकोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनस्थळाला जाऊन पंचनामा केला. आगार प्रमुख आगरकर हे सुद्धा त्या ठिकाणी घटना तरी दाखल झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या