Ticker

6/recent/ticker-posts

हत्तीरुग्णांची वैद्यकीय तपासणी व दिव्यांग शिबिर


पाचवे शिबिर

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
अमरावती - जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालय अमरावती मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे अमरावती जिल्ह्यातील 63 हत्तीरुग्णांची ग्रेडनिहाय तपासणी करण्यात आली.
      या सर्व हत्तीरुग्णांची तपासणी डॉ.संतोष राऊत, डॉ.चेतन साकोरे, डॉ.प्रिती मोरे, डॉ.अर्पिता कोकीटकर यांनी केली व समुपदेशन श्रीमती.अश्विनी म्हेसणे, श्री.प्रमोद भक्ते  यांनी केलं.
      हे शिबिर मा.उपसंचालक डॉ.कमलेश भंडारी, मा.सहायक संचालक श्रीमती डॉ.राधा जोगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी, मा.हत्तीरोग अधिकारी श्री.दिनेश भगत, डॉ.जुनेद, प्र.वै.अधिकारी श्री.जी.बी.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
          या शिबिरात हत्तीरुग्णांना सखोल मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण व या सर्व शिबिराचे नियोजन आरोग्य कर्मचारी श्री.प्रकाश दातीर व श्री.अशोक राठोड यांनी केले. यावेळी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक व रात्र चिकित्सालयातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या