लिंगोजी कदम चित्रा न्युज
नांदेड :-हिमायतनगर शहरातील फुले नगर व सिद्धार्थ नगर येथे मागील काही दिवसांपासून या भागातील वेळोवेळी विज पुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं असुन विज पुरवठा खंडित होत असल्यामुळे या चोरीच्या प्रकरणात वाढ झाल्याने येथील नागरिकांनी महावितरण कार्यालय येथे निवेदनाद्वारे विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिमायतनगर शहरांसह फुलेनगर व सिद्धार्थनगर येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कारण वीज पुरवठ्या अभावी या भागातील नागरिकांना पाण्याची समस्या भोगावी लागत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोअर मध्ये पाणी असूनही विजेअभावी पाणी मिळत नाही.रात्रीच्या वेळी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या भागात चोरीचे प्रमाणही वाढत आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देवून या भागात विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सिध्दार्थ नगर व फुलेनगर येथील नागरिकांनी महावितरण कार्यालय येथे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सुभाष दारवंडे, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले , जहीर मिर्झा, सोपान कोळगीर, परमेश्वर जाधव, प्रतीक दारवंडे, दिगंबर अंभोरे, बाबू लोमदे, उपस्थित होते तसेच या भागात वेळोवेळी विज पुरवठा खंडित होत असलेला महावितरण विभागाने थांबवावा अन्यथा लोकशाही मार्गाने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ज्ञानेश्वर
लिंगमपल्ले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.


0 टिप्पण्या