Ticker

6/recent/ticker-posts

मणिपूर हिंसाचारावर केंद्र सरकारचे दुर्लक्ष: आनंद दुबे यांचा आरोप


हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज 
मुंबई :-शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मणिपूरमधील हिंसाचारावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, "आम्ही नेहमी मागणी करत असतो की मणिपूरमध्ये होत असलेली हिंसा थांबवायला हवी. आज मोहन भागवतजींनाही समजले आहे की मणिपूर गेल्या वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे."

आनंद दुबे यांनी केंद्रातील डबल इंजिन सरकारवरही टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, "केंद्र सरकार ज्या राज्यातील जास्त खासदार आहेत तिकडे काहीही झालं तरी पळत जाते. पण ज्या राज्यातील कमी खासदार आहेत, त्या राज्यात दोन वर्षे झाले हिंसेच्या आगीत जळत आहे, तरी तिकडे कोणीही लक्ष देत नाही."

मोहन भागवत यांच्याकडेही त्यांनी आवाहन केले की, "मोहन भागवत, तुम्ही आरएसएस प्रमुख आहात, तुम्ही सरकारपेक्षा मोठे मानले जातात. सरकारला सांगा की तिथे जावे, केवळ भाषण देऊन काहीही होणार नाही."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या