Ticker

6/recent/ticker-posts

अशासकीय समित्यांच्या नियुक्त्या रखडल्याने हाळी-हंडरगुळी येथील महायुतीचे कार्यकर्ते रुसले ; नाराज कार्यकर्ते प्रचारात अलिप्त राहिले ..


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-हाळी-हंडरगुळी / (वा)राज्यातील महायुतीचे सरकार सत्तेत येऊन 2 वर्षाचा काळ होत आला तरी पण उदगीर तालुकास्तरीय संगायो - इंगायो,रोहयो,विद्युत व अन्न पुरवठा , दक्षता,यासारख्या समित्यांची घोषणा
अद्यापही पालकमंञ्याने केलेली नाही यामुळे महायुतीतील कार्यर्ते नाराज झाले आणि लोकसभेच्या प्रचारात रुसुन बसल्याने याचा फटका भाजपा उमेदवारास बसला आहे.अशी चर्चा हाळी-हंडरगुळीत सुरु आहे.तसेच 40 टक्के भाजपा तर 30 टक्के शिंदे व 30 टक्के अ.प.गट या सुञावरुनच विविध प्रकारच्या शासकिय आणि निमशासकिय समित्यांच्या नियुक्त्या रखडल्याचे ही बोलले जात असले तरीही आगामी विधानसभा आणि त्याचा शिल्लक कालावधी लक्षात घेता या रखडलेल्या निवडी भाजपाचे संकट मोचक तथा जिल्ह्याचे पालक मंञी असलेले गिरीष महाजन हे या निवडी करतील ! अशी भाबडी आशा महायुतीच्या कार्यकर्त्यांना आहे.
रा.काॅं.चा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर कुठे , कोणता पालक मंञी होणार.या निवडीसाठी बराच कालावधी वाया गेला.आणि एकदाचे पालकमंञी जाहीर झाले.त्यात ही या भागाच्या आमदारास नामदार केले खरे माञ पालकमंञी केले खान्देशी आमदाराला.आणि या पालकमंञी महोदयाने केवळ जिल्हा नियोजन वगळता उदगीर तालुक्यातील वरील समित्या अद्यापही जाहीर केले नाही. म्हणुन आम्ही काय फक्त सतंरज्याच उचलायच्या का असा सवाल विविध समिती मध्ये सदस्य म्हणुन जाण्याची आशा बाळगुन बसलेले महायुतीतील धडपड्या कार्यकर्त्यांतुन उपस्थित केला जात आहे.तसेच समित्यावरील अशासकीय सदस्यांची निवड अद्याप ही झाली नसल्याने रुसलेले कायकर्ते लोकसभेच्या प्रचारात दिसले नाहीत. व याचा कांहीअंशी फटका भाजपास बसल्याचे तसेच असाच फटका येत्या आमदारकीला बसु नये,यासाठी या रखडलेल्या निवडी करा.असे कट्टर व मतदारात वटअसलेल्यांत बोलले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या