🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - ९ जुलै
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
भा. रा. १८ आषाढ १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : ग्रीष्म
मास: आषाढ
पक्ष: शुक्ल
तिथी: तृतीया (०६.१०) ~ चतुर्थी
वार : मंगळवार
नक्षत्र : आश्लेषा (०७.५०) ~ मघा
राशी : कर्क (०७.५०) ~ सिंह
*विनायक चतुर्थी* (अंगारक योग)
१८७३ : मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.
१८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.
१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.
१९४४: ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
१९५१ : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१९६९ : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
२००६ : सैबेरियातील इर्कुट शहराच्या विमानतळावर भरपावसात उतरण्याच्या प्रयत्नात असलेले सिबिर एरलाइन्सचे एरबस ए-३१० प्रकारचे विमान कोसळले. २०० प्रवाशांपैकी १२२ ठार.
२०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली. त्याबरोबरच सॅम्प्रसने आपल्या कारकिर्दीतील तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.
२०११: सुदान मधून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.
जन्मदिवस
१८१९: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे
१९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व जनसंघाचे नेते रामभाऊ म्हाळगी! जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष.
१९२३: परम विशिष्ठ सेवा पद आणि वीर चक्र सन्मानित मेजर-जनरल लच्छमानसिंग लेहल
१९२५ : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त. त्यांचे ‘चौदहवी का चांद‘, ‘कागज के फूल‘, ‘सीआयडी‘, ‘मि. अंड मिसेस ५५‘, ‘आरपार‘ आणि ‘प्यासा‘ इ. चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले.
१९३८ : चित्रसृष्टीतील अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार, रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते.
१९५०: युक्रेन चे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच
१९७१: नेटस्केप चे सहसंस्थापक मार्क अँडरसन
मृत्यूदिन
२००५ : डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य
१९९३- सोनिक, सोनिक - ओमी जोडीतला संगीतकार व वाद्यवृंद संयोजक
१९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक, प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर, स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते
१९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट
१९४४: युद्धप्रसंगी राष्ट्रकुल सैन्याला पुरविल्या जाणार्या सेवाप्रसंगी शत्रूच्या सामन्यात शौर्याचा सर्वात उच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉसचे विजेता फ्रँक गेराल्ड ब्लॅकर.
१९६८: ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते.
१९९३: संगीतकार व वाद्यवृंद संयोजक या सोनिक-ओमी (काका-पुतणे) जोडीतील मनोहरलाल सोनिक.
२००५ : डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य
*।। दास-वाणी ।।*
दिवाळखोराचा मांड ।
पाहातां वैभव दिसे उदंड ।
परी ते अवघे थोतांड ।
भंड पुढें ।।
तैसें प्रचितीवीण ज्ञान ।
तेथें नाहीं समाधान ।
करून बहुतांचा अनुमान ।
अन्हीत जालें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १०/०८/१५-१६
कर्जबाजारी दिवाळखोर भपक्यामधे वावरू शकतो. वरवर उदंड पैसा अडका असल्याचा तो दिखावा करू शकतो. पण हा उसनवारीचा डामडौल म्हणजे निव्वळ थोतांड असते. वेळ येता समाजामधे फटफजिती निश्चित असते.
त्याचप्रमाणे प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय वक्त्याचे दिखाऊ ज्ञानप्रदर्शन हे सभेचे समाधान करू शकत नाही. हा ज्ञानाचा डोलारा श्रोत्यांना गोंधळातच टाकतो.
पारमार्थिक हित तर फार दूरची गोष्ट, असे पोपटपंची वक्ते श्रोत्यांना साधे भक्तीमार्गालाही लावू शकत नाहीत.
*प्रचितनिरूपण समास.*
*विशेष माहिती*
*वाघ* : वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे.
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या