पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव - जळगांव येथे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री मा.ना. श्री.गुलाबराव जी पाटील यांचे स्विय सहायक मा.श्री.नवल सिंग राजे यांनी चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथील सरपंच श्री. भूषण गोरख पाटील यांचा सत्कार केला त्यावेळी श्री नवलराजे पाटील सोबत मा.सभापती.पंचायत समिती चोपडा श्री एम व्ही नाना पाटील, जिल्हा बँकेचे मा.शाखा व्यवस्थापक आदरणीय आबासाहेब श्री.डी.बी.पाटील श्री नारायण पाटील कुरवेल श्री तुषार पाटील वढोदेकर उपस्थित होते.- खालील माहिती सविस्तर -वरगव्हाण तालुका चोपडा येथील आदर्श शेतकरी गोरख तात्या यांचे चिरंजीव आणि वरगाव्हन गावाचे लाडके सरपंच प्रवीण उर्फ भूषण गोरख पाटील यांच्या खात्यावर शनिवार रोजी एका व्यापाऱ्याने अचानक तीन लाख रुपये टाकले त्यावेळेस त्यांना बँकेचे मेसेज आला असता त्यांना वाटले की हे आपले पीक विम्याचे पैसे असतील मात्र त्यांनी बँकेत जाऊन स्टेटमेंट चेक केले असता ही रक्कम आपल्या खात्यावर एका व्यापाऱ्याने टाकल्याने ते देखील अचंबित झाले ,त्या व्यापाऱ्याने धानोरा येथील आवेश खान या केळी व्यापाऱ्याला फोन लावला त्याने लागलीच, प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क करत या नावाची व्यक्ती आपल्या गावात कोण आहे असे विचारले असता भूषण पाटील यांनी प्रामाणिकपणे आपणच ती व्यक्ती असून आपल्याच खात्यावर अचानक तीन लाख रुपये आले आहेत व ते कोणाचेही असो आपण ते इमाने इतबारीने परत करू त्यांनी काळजी करू नये असे सांगितले, त्याचप्रमाणे आदर्श सरपंच प्रवीण उर्फ भूषण भाऊ पाटील यांनी आज संबंधित व्यापाराला तीन लाख रुपयाचा चेक दिला आहे भूषण भाऊ आपल्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे शब्द कमीच आहेत आपल्या इमानदारीने आणि प्रामाणिकपणाने पुन्हा एकदा व गाव्हण सह परिसरातील शेतकरी वर्ग ची मान उंचावलेली आहे आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


0 टिप्पण्या