Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞

‌इसवी सन २०२४ - ३ जुलै 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. १२ आषाढ १९४६
युगाब्द ५१२६       
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण 
ऋतू : ग्रीष्म 
मास: ज्येष्ठ 
पक्ष: कृष्ण 
तिथी: द्वादशी (०७.१०) ~ त्रयोदशी                                   
वार : बुधवार 
नक्षत्र : रोहिणी  (२८.१०) ~ मृग     
 राशी :   वृषभ 

*बुध प्रदोष*
*संत निवृत्ती नाथ महाराज समाधी दिन*, त्र्यंबकेश्वर, नाशिक. 
*अंगिरस ऋषी जयंती*

*आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशव्या मुक्ती दिन*

२००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.
२००१: सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके (बाबूजी) यांना राज्य सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
२०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.
१९३८:'मॅलार्ड' हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.
१९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.
१९०८: इंग्रज सरकारने लोकमान्य टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली.
१८८६:जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
१८८४:डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
१८५५:भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
१८५२:महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
१८५०:ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला ’कोहिनूर’ हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
१७६०: मराठा सेनेने दिल्लीवर ताबा मिळविला.
१६६१: पोर्तुगीजांनी इंग्लंडचे राजा चार्ल्स(Charles) द्वितीय यांना मुंबई व तंजौर बेट भेट दिले.
१६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.

जन्मदिवस :
१९८०:हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू
१९७१: विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज 
१९५२: भारतीय गायक अमित कुमार 
१९२६:सुनीता देशपांडे – लेखिका व"  स्वातंत्र्यसैनिक 
१९२४: तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन
१९०९:बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ 
१८८६:रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन , महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक 
१८३८:मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक 

मृत्यूदिन:
२०२०: हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर सरोज खान 
१९९६: कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता 
१९६९: ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक, 
१९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन
१३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली.

             *।। दास-वाणी ।।*

जाणीव म्हणिजे अंत:कर्ण । 
अंत:कर्ण विष्णूचा अंश जाण । 
विष्णू करितो पाळण । 
येणें प्रकारें  ।। 

नेणता प्राणी संव्हारतो । 
नेणीव तमोगुण बोलिजेतो । 
तमोगुणे रूद्र संव्हारितो । 
येणें प्रकारें  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १०/०१/२६-२७ 

जाणीव म्हणजे अंत:करण.
अंत:करण हा देहातील विष्णूचा अंश.
विष्णू हा सत्वगुणी. 
देहाच्या स्थिती म्हणजे चालक अवस्थेचा देव.
जाणीव हे जाणपण आहे.
देह टिकतो तो जाणीवेमुळेच.
म्हणजे अंत:करणातील विष्णू हा 
जाणीवरूपाने जीवाचे पालन करतो. सांभाळतो.

नेणीव म्हणजे न समजणे.
न कळले तर जीवाचा नाश नक्कीच ठरलाय.
नेणीव म्हणजेच तमोगुण.
तमोगुणाची देवता रूद्र.
नेणीवेमुळे जीवाचा नाश ओढवतो.
म्हणजेच रूद्र हा संहारकर्ता.

जाणपण, नेणपण या दोन्ही प्रत्येक प्राणीमात्राच्या ठायी असलेल्या भिन्न भावना आहेत. परंतु त्या उमटणारे सर्वांचे अंत:करण मात्र एकच आहे.

*अंत:करणयेकनाम समास.*

*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या