Ticker

6/recent/ticker-posts

उत्पन्नाचे प्रमाणपत्राऐवजी शिधापत्रिकाही चालेल

• मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नवा पर्याय

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट ही महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं अशी होती. या करिता उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून द्यावा लागेल. पण आता तहसील कार्यालयात होणारी गर्दी पाहता राज्य सरकारने उत्पन्नाचा दाखला नसेल तर वेगळा पर्याय सुचवला आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. पात्र महिलांना अर्ज भरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता होती. पण संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी तहसील कार्यालय, नेत कॅफे, आपले सरकार सेवा केंद्राबाहेर महिलांसह नातेवाईकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी होत असल्याचे शासनाचे निदर्शनास आल्याने लाभार्थी महिलांना काही कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. उत्पन्नाच्या दाखलाऐवजी ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी शिधापत्रिका उपलब्ध आहे त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रापासून सुट देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली असल्यामुळे लाभार्थी महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या योजनेची अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. २१ वर्षांवरील कुटुंबातून १ अविवाहित महीलेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत लाभार्थी ठरविण्यात आले आहे. या शिवाय विवाहित महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित आणि निराधार २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या