Ticker

6/recent/ticker-posts

महामार्गांवरील सुरक्षा भिंत पहिल्याच पावसात जमीनदोस्त


 लाखांदूर-अंतरगाव रस्त्यावरील प्रकार

बांधकामाचे दर्जावर प्रश्नचिन्ह 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- जिल्ह्याला आंध्रप्रदेशाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लाखांदूर ते अंतरगाव दरम्यान असलेल्या ओढ्यालगत बांधण्यात आलेले सिमेंट काँक्रिट ची सुरक्षा भिंत पहिल्याच पावसाने कोसळली असून मुख्य रस्त्याचे कडेला लावलेले गट्टूही उखडलेले आहेत. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ चे बांधकाम कासव गतीने व निकृष्ट प्रतीचे होत असल्याची ओरड होत होती. या घटनेने त्या बाबीला पुष्टी मिळाली आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सुरक्षा भिंत बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून दोषींवर कारवाई करावी. अशी युवक काँग्रेस द्वारा मागणी होत आहेत. 
                          राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील लाखांदूर ते अंतरगाव दरम्यानचे नाल्यावर पुलाचे बांधकाम करतांना महामार्गाचे दोन्ही बाजूला अंदाजे १० फूट उंच व २५ मीटर लांब सिमेंट काँक्रिट ची सुरक्षा भिंत बांधण्यात आली होती. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्त्याला या महामार्गाचे बांधकामाचे कंत्राट देण्यात आले असल्याने आपले कोणी काही बिघडवू शकत नाही. या न्यायाने त्याने अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार साहित्याचा वापर केला गेला नसल्यामुळे सुरक्षा भिंतीचे बांधकाम निम्न प्रतीचे झाले होते. त्यामुळे बुधवारी(३ जुलै) रोजी रात्री झालेल्या पावसामुळे सुरक्षा भिंत जमीनदोस्त झाली. सोबतच सिमेंट काँक्रिट रस्त्याचे दोन्ही कडेला लावलेले गट्टूही अस्ताव्यस्त झाले तर रस्त्याला तडेही गेल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. महामार्ग क्रमांक ३५३ चे बांधकाम कंत्राटदाराकरवी साहित्याचा अत्यल्प प्रमाणात वापर करून कासव गतीने होत असल्यामुळे बांधकाम निम्न प्रतीचे होत असल्याची ओरड होत होती. सुरक्षा भिंत जमीनदोस्त झाल्यामुळे  बांधकाम निकृष्ट झाले असल्याच्या बाबीस बळ मिळते. संबंधित विभागाने लाखांदूर ते अंतरगाव दरम्यान नाल्याचे दोन्ही बाजूला तयार करण्यात आलेल्या सुरक्षा भिंत बांधकामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी. अशी युवक काँग्रेस कडून मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या