सोमनाथ खंडागळे सोलापूर
सोलापूर :-माळशिरस तालुका वैधकीय अधिकारी म्हणून प्रियंका शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उप तालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे यांच्या वतीने करण्यात आला यावेळी युवा सेनेचे अकलूज उप शहर प्रमुख युवराज पवार वाघोली गावचे युवा नेते रणजित दादा पवार, सोमनाथ पवार , सोपान लवटे,भैय्या इंगळे, विक्रम साळुंखे ,इ युवा सैनिक उपस्थित होतो यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रियंका शिंदे म्हणाल्या की माळशिरस तालुक्यात 1 उपजिल्हा रुग्णालय ,2 ग्रामीण रुग्णालय, 12 प्राथमिक आरोग्य केंद्र, 34 आरोग्य सल्ला व उपचार केंद्र असून त्या ठिकाणी आवशक तेवढा औषध साठा माळशिरस तालुक्यात उपलब्ध आहे. गोर गरीब रुग्णांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास होऊ देणार नाही .ज्या रुग्णालयात रुग्णांना त्रास झाला किंवा सुख सुविधा देण्यात आल्या नाहीत असे निदर्शनास आले तर तेथील कर्मचारी किंवा डॉक्टर यांचे वरती त्वरित कारवाई करण्यात येईल .हॉस्पिटल समंधी रुग्णान समंधी काही अडी अडचणी असतील तर तात्काळ सांगाव्यात असे आवाहन तालुका वैधकीय अधिकारी प्रियंका शिंदे यांनी केले आहे .


0 टिप्पण्या