Ticker

6/recent/ticker-posts

साकोली विधानसभा रिपाई(आठवले) गटाचे कोट्यात द्यावी


• कार्यकर्त्यांचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना साकडे

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- महायुतीचा घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) गटाला साकोली विधानसभा क्षेत्र सोडण्यात यावे. या करिता लाखनी, साकोली, लाखांदूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचेकडे मागणी केली आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात. याकडे साकोली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 
                        रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) २०१४ पासून सत्ताधारी एनडीए चा घटकपक्ष आहे. २०१९ चे विधानसभा निवडणुकीत रिपाई(आठवले) च्या कोट्यात ६ विधानसभेच्या जागा आल्या होत्या. त्यात भंडारा विधानसभा क्षेत्राचा समावेश होता. या जागेवर रिपाई(आठवले) चे अरविंद भालाधरे यांनी भाजपा च्या चिन्हावर निवडणूक लढविली. पण भाजपा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांचा पराभव होऊन अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. त्या नंतर रिपाई(आठवले) गटाने या विधानसभा निवडणुकीचा कटून अनुभव लक्षात घेता साकोली विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. तसेच जिल्ह्यातील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू देऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी तथा जुने जाणते पदाधिकारी पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून नेहमीच कार्यकर्त्यांचे संपर्कात असतात. साकोली विधानसभा क्षेत्रात स्वबळावर निवडणूक लढून निवडून येण्याची कुवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) गटाने निर्माण केली आहे. या प्रकाराने कार्यकर्त्यांत आत्मविश्वास बळावला असून साकोली विधानसभा क्षेत्र आठवले गटाचे कोट्यात देण्यात आल्यास विजय निश्चित मानला जात असल्यामुळे साकोली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना साकोली विधानसभा क्षेत्र आपल्या कोट्यात घेण्यास साकडे घातले असून आवश्यकता भासल्यास कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरिनिशी निवेदन देण्यात येईल. असे नाव न छापण्याच्या अटीवर एका जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्याने सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या