• पंचायत समिती सदस्य किशोर मडावी यांचे आदिवासी जनतेला आवाहन
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- अनुसूचित जमाती प्रवर्गातील समाविष्ट असलेल्या व्यक्ती व संस्थांचे उत्थानासाठी आदिवासी विकास विभागामार्फत प्रकल्प कार्यालयाचे वतीने विविध प्रकारच्या २८ योजना चालविला जातात. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य किशोर मडावी यांनी केले आहे. या विविध योजनांची माहिती नागरिकांच्या सनद मध्ये पहावयास मिळते. त्या योजना अशा आहेत. शासकीय आश्रमशाळा समूह योजना. स्वेच्छा संस्थांना आश्रमशाळा चालविण्यास अर्थसहाय्य. शासकीय आश्रमशाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्यानामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे. आदर्श आश्रमशाळा. आदिवासी मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षोतर शिष्यवृत्ती. राज्यातील शासनमान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कांच्या प्रतिपूर्तीबाबत. व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसुचित जमतीच्या विठ्यार्थ्याना निर्वाह भत्ता देणे. सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृती योजना. अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलीना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे. अनुसूचित जमातीशिष्यवृत्तीच्या शेतकऱ्यांना ववीज पंप/तेल पंप पुरवठा योजना. न्यूक्लियस बजेट. मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्र योजना. सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण योजना. व्यवसाय प्रशिक्षणकेंद्रा योजना. केंद्र सरकार सहाय्य योजना. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सेवायोजन नोंदणी. आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिककार्यकर्त्याना य संस्थाना आदिवासीं सेवक/सेवा संस्थापुरस्कार, राज्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये कन्यादान योजना राबविणे. भूमिहीन दारिद्रय रेषेखालील आदिवासीचे सबलिकरण व स्वाभिमान योजना. आदिवासीं शेतकऱ्यांना पी. व्ही.सी./एच.डी.पी ई पाईपचा पुरवठा करणे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना. आदीवासी युवक युवतीच्या कौशल्य विकासासी संस्थेची योजना. इयता ८ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असललेल्या अनुसूचीत जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यावृती व वाहतुक भत्ता देणे. शबरी घरकुल योजना. पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविणे. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना. ह्या योजना असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती व संस्थांना लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य किशोर मडावी यांनी केले आहे.


0 टिप्पण्या