Ticker

6/recent/ticker-posts

महाज्योती द्वारा जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षा प्रवेशपूर्व प्रशिक्षण


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था(महाज्योती द्वारा शैक्षणीक सत्र २०२६ करिता महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग, भटक्या जाती-विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परिक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पध्दतीने महाज्योती मार्फत देण्यात येणार आहे. त्या करिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व ६ जीबी प्रती दिवस इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. या करिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावे. असे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
*ही आहे योजनेच्या लाभासाठी पात्रता(चौकट)*
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा. २०२४ मध्ये १०वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या लाभासाठी पात्र राहतील. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याची निवड १०वी चे परीक्षेत प्राप्त टक्केवारी, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. इयत्ता १०वीत शहरी भागातील विद्यार्थी ७० टक्के व ग्रामीण भागातील विद्यार्थी ६० टक्के किंवा त्या पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी शहरी वा ग्रामीण भागातील आहे. हे आधार कार्ड वरील पत्त्यावरून ठरविल्या जाईल. 


ही आहेत आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड. रहिवाशी दाखला(डोमेशियल). जातीचे प्रमाणपत्र(कास्ट सर्टिफिकेट). वैद्य नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. १०वी ची गुणपत्रिका. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला(बोनाफाईड सर्टिफिकेट). दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र. अनाथ असल्यास प्रमाणपत्र. अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या