🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - ५ जुलै
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत
२०८०
भा. रा. १४ आषाढ १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : ग्रीष्म
मास: ज्येष्ठ
पक्ष: कृष्ण
तिथी: अमावास्या (२८.२५) ~ प्रतिपदा
वार : शुक्रवार
नक्षत्र : आर्द्रा (२८.०५) ~ पुनर्वसु
राशी : मिथुन
*ज्येष्ठ अमावास्या*
*दर्श अमावास्या*
*अमावास्या समाप्ती उत्तर रात्री (पहाटे) ५ वाजता*
*सूर्याचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश* *(रात्री ११.४० ला, वाहन हत्ती )*
*राज्य मतदार दिन* (महाराष्ट्र)
*आझाद हिंद सेनेचा स्थापनादिन*
१६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित केला.
१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
१८४१: थॉमस कुक याने लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
१९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
१९१३ : किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.
१९४६: फ्रान्सने फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात आला व त्याची विक्री सुरू झाली.
१९५०: इस्रायेलच्या क्नेसेटने , जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
१९५१: विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
१९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन वार्तापत्र प्रसारित केले.
१९७५: देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
१९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.
१९९७ : स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. हे तिच्या कारकिर्दितील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते.
१९९८: भारतीय लष्कर दलाने स्वदेशी निर्मित रणगाडाविरोधी नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
१९९८: जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
१९९९: संयुक्त राष्ट्र अमेरिकेने तालिबान राष्ट्रावर प्रतिबंध लावण्याची
घोषणा केली.
२००९ : अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
२०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीची लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
२०१७: राज्य मतदार दिनाची (महाराष्ट्र) सुरुवात.
जन्मदिवस
१९९५: पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधु उर्फ पी. वी. सिंधु
१९६८: युट्युबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी.
१९५२ : रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक
१९४६ : राम विलास पासवान – केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष
१९२५ : नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल
१९२० : आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक
१९१६ : के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक.
मृत्यूदिन
१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी
१९९६: रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर
१९९९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे.
२००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन
*।। दास-वाणी ।।*
वायोमध्यें विष्णू होता ।
तो वायोस्वरूपचि तत्वता ।
पुढे झाला देहधर्ता ।
चतुर्भुज ।।
तैसाच ब्रह्मा आणि महेश ।
देह धरिती सावकास ।
गुप्त प्रगट होतां तयांस ।
वेळ नाही ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १०/०४/२१-२२
देव सुद्धा पंचमहाभूते आणि त्रिगुणांनी
बांधलेले असतात.
आकाशामधे वायू निर्माण होतो.
वायूमधील जगज्योती म्हणजे जाणतीकळा या स्वरूपामधे विष्णू हा बीजरूपामधे होताच.
भगवान विष्णू व्यक्त होताना चतुर्भुज
देह धारण करून आले.
त्याचप्रमाणे ब्रह्मा आणि महेश देखील
योग्य वेळ येताच देह धारण करतात.
क्षणात गुप्त किंवा प्रगट होण्याची क्षमता या तीनही देवांमध्ये असते.
विष्णू हा देहाच्या जाणीवेचा स्वामी आहे. ही ज्ञानाची स्थिती आहे. सत्वगुण दर्शविते.
महेश हा जीवाच्या नेणीव म्हणजे अज्ञान या अवस्थेचा स्वामी आहे. तमोगुण दर्शवते.
तर ब्रह्मदेव हा देहाच्या जाणीव आणि नेणीव या संमिश्र अवस्थेचा स्वामी आहे. तो रजोगुणाचा द्योतक आहे.
*बीजलक्षण समास.*
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या