Ticker

6/recent/ticker-posts

बदलापूर येथील मुलीवर झालेल्या लैंगिक अत्त्याचार घटनेतील दोषींना फाशिची शिक्षा झालीच पाहिजे, निळी क्रांती संघटनेची मागणी..!


सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज

बदलापूर -  बदलापूर येथील आदर्श विद्यालयात  शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला.12 आणि 13ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या घरच्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली.
या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही. तब्बल १२ तासांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होतोय. ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बदलापूर शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी 
निळी क्रांती संघटने कडून करण्यात येत आहे. 
तसेच श्री माधव बागडे यांच्या मार्गदशनाखाली आणि आशिष चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमेश बागडे ,चेतन कांबळे,विजय थोरात,श्याम चंदनशिव,अक्षय मानवरे,प्रफुल पांडागळे,अभय शिंदे,प्रदीप मेश्राम यांनी तहसील दार कार्यालय उल्हासनगर ५ येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या