मागोवा निवडणुकांचा --
रवि भोंगाने साकोली
साकोली:-महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक २ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे शासकीय यंत्रणा सुद्धा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येते. निवडणुकांचे दिवस आले की उमेदवार हौसेला येतात. तसे मतदार देखील निवडणूक काळात आलेल्या बातम्यांवर जास्त लक्ष देत असतात. निवडणूका येतात आणि जातात. तशे मतदार देखील मागील निवडणुकांच्या राजकीय इतिहासात शिरत असतात. त्यामुळे वाचक वर्गालाआणि राजकारणात वावरणाऱ्यासाठी प्रमुख राजकीय उमेदवार,
त्यांना मिळालेली मते आणि त्यावेळची मतदार संख्या याचा राजकीय प्रवास उलगडण्याचा हा सुरूवातीला ४ दशकाचा प्रयत्न. विदर्भात विधानसभेच्या निवडणुका १९५२ पासून सुरू झाल्यात. वाचकांसमोर ठेवत असलेली माहिती १९६२ पासूनची आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरची आहे. त्यामूळे १९५२ आणि १९५७ च्या निवडणुकांचा समावेश टाळला गेला आहे. याचे कारण १९५२ ची निवडणूक मध्य प्रदेश विधानसभेची होती तर १९५७ ची निवडणूक द्विभाषिक राज्याची होतीअसो.* प्रथम निवडणूक १९६२ * प्रमुख उमेदवार आडकुजी पाऊलझगडे ( काँग्रेस) १८,५३५, श्यामरावबापू कापगते (जनसंघ) १४,३२४, भानुदास बनसोड ( रि.प.) १३,७४८. एकूण मतदार ८१,९०४, झालेले मतदान ५३,१५९ . * निवडणूक १९६७ * शामरावबापू कापगते (जनसंघ) २०,९०४, अर्जुन समरित (काँग्रेस) १६,९८०, सदानंद रामटेके (री.प.) १३,४१४. एकूण मतदार ८०,५५४. * निवडणूक १९७२ * मार्तंडराव कापगते (काँग्रेस) ३४,३३६, शामरावबापू कापगते (जनसंघ) २१,२४५, राजाराम महाले (रि.प) ११,३५० एकूण मतदार ९०,४६३. * निवडणूक १९७८ * मधुकर बेदरकर (काँग्रेस) ३९,९०८, शामरावबापू कापगते ( जनसंघ ) ३६,०९३, मार्तंडराव कापगते (अर्स ) ७,४८९. एकूण मतदार १,१०,५२७, झालेले मतदान ९०,१२४. *निवडणूक १९८० * जयंतराव कटकवार (काँग्रेस) ३०,९५३ , गोविंद निंबेकर (भाजप) २६,९७६, काशिनाथ वाघाये ( अर्स ) ११,१७६. एकूण मतदार १,१७,०४८, झालेले मतदान ७७,१५७. * निवडणूक १९८५ * जयंत कटकवार (काँग्रेस) २९,७४३, मनोहर खेडीकर (भाजप) १४,२४२ मनोहर घोडीचोर ( रि.प.) १४,७८७. एकूण मतदार १,२१,०३१. झालेले मतदान ८३,४४७. * निवडणूक १९९० * डॉ. हेमकृष्ण कापगते (भाजपा) ३९,३५२, जनार्दन बडोले (अर्स) १८,६४६ जयंत कटकवार (काँग्रेस) १६,५३३. एकूण मतदार १,४५,५६०. झालेले मतदान १,०८,२१०, * निवडणूक १९९५ * डॉ. हेमकृष्ण कापगते (भाजपा) ४९,०५९, सेवकभाऊ वाघाये (काँग्रेस) ३९,०४४, डॉ. ब्रम्हानंद करंजेकर (बसपा ) ३०,६७५. एकूण मतदार १,५५,३६४, झालेले मतदान १,३३,३०२. * निवडणूक १९९९ * सेवक वाघाये ( काँग्रेस) ४८,६५४, शिवराम गिरेपुंजे (भाजपा) ४१, २८१, यादवराव पडोळे (एनसीपी) १४,५६८. एकुण मतदार १,५३,०३ झालेले मतदान १,२२,६६३.


0 टिप्पण्या