Ticker

6/recent/ticker-posts

रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान

• निमा असोसिएशन चा स्तुप्त्य उपक्रम 


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात निमा असोसिएशन भंडारा व समर्थ महाविद्यालय लाखनी यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी(ता.४ ऑगस्ट) रोजी आयोजित रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात दिनेश पंचबुद्धे यांनी २९, दिलीप सचदेवा यांनी २६ तर सुहर बोरकर यांनी २२ वेळा रक्तदान केले. हे विशेष. 
                        रक्तदान हे जीवनदान आहे. रक्तदान करून व्हा पुण्यवान ही सामाजिकता जोपासून गरजूंना वेळीच रक्त पुरवठा व्हावा. या उदात्त हेतूने निमा असोसिएशन भंडारा व समर्थ महाविद्यालय लाखनी यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन जि.प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, निमा चे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते व समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांचे हस्ते करण्यात आले. सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजता पर्यंत चाललेल्या या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सामान्य रुग्णालय भंडारा द्वारे रक्तसंकलन करण्यात आले. रक्तसंकलन अधिकारी डी.एस. कोकोडे, डॉ. अदिती मेढेकर, जन संपर्क अधिकारी राजू नागदेवे, कल्पना येवले, तृप्ती गभने, हनुमान डूपटे, शरद जांभुळे, वाहन चालक राहुल गिरी या चमूने यशस्वी कामगिरी बजावली. या रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ता दिनेश पंचबुद्धे यांनी १९, दिलीप सचदेवा २६ तर सुहास बोरकर यांनी २२ वेळा रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे यशस्वीतेसाठी नंदलाल चौधरी, सौरभ फरांडे, सुहास बोरकर, दिलीप सचदेवा आणि समर्थ महाविद्यालयातील बाळकृष्ण रामटेके, धनंजय गिरेपुंजे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या