• गुढरी/टोली येथील घटना
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- हिंस्त्र श्वापदांच्या भीतीने गावालगत चराईसाठी आलेल्या चितळाची मोकाट श्वानाला चाहूल लागताच पाठलाग करून हल्ला केल्याने जखमी केल्याची घटना सोमवार(ता.५ ऑगस्ट) रोजी सकाळी ६:०० वाजता दरम्यान वनक्षेत्र लाखनी चे अंतर्गत सहवनक्षेत्र जांभळी/सडक चे अधिनस्त गुढरी/टोली येथे उघडकीस आली. गावातील वन्यप्रेमींनी चितळाला श्वानाचे तावडीतून सोडवून वन कर्मचाऱ्यांचे स्वाधीन करण्यात आल्याने चितळाला जीवदान मिळाले असल्यामुळे वन्यप्रेमींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त सहवनक्षेत्र जांभळी, वनरक्षक बीट गुढरी मोठ्या झाडाचे पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्यातीप्राप्त असल्यामुळे या वनक्षेत्रात हिंस्त्र श्वापदांसह तृणभक्षी प्राणी, सरपटणारे प्राणी व रंगीबेरंगी फुलपाखरे या शिवाय इमारती लाकूड व वन औषधी या वनाचे वैभव आहे. सोमवारी सकाळचे सुमारास हिंस्त्र श्र्वापदांचे भीतीने चितळ गुढरी/टोला गावालगत चराईकरिता आल्याची चाहूल लागताच गावातील मोकाट श्वानांनी चितळाचा पाठलाग हल्ला केल्याचे ही बाब गावातील वन्य प्रमिंच्या निदर्शनास आल्यामुळे चितळाला श्र्वानांच्या तावडीतून सोडवून निलागोंदी चे वनरक्षक कु. आर. डब्ल्यु राऊत व मुंडीपार चे वनरक्षक आर. सी. भराडे यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून बीट रक्षक कुमारी राऊत हिने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच वन परिक्षेत्र अधिकारी यांनी एनएनटीआर चमू व आरआरटी चमू नागझिरा चे सर्व कर्मचाऱ्यांना रेस्क्यूसाठी बोलावण्यात आले. सकाळी ७:०० वाजता दरम्यान वन कर्मचाऱ्यांनी जखमी चितळाला ताब्यात घेऊन आरआरटी चमूचे मदतीने पशुधन विकास अधिकारी साकोली यांचे मार्फत उपचार करून दुपारचे सुमारास निसर्गाचे सानिध्यात सोडण्यात आले. यावेळी गुढरी/टोली चे माजी सरपंच गणेश पारधीकर सामाजिक कार्यकर्ते लव पारधीकर, वनरक्षक कू. आर. डब्ल्यु राऊत यांचे वनमजूर व गावकरी उपस्थित होते. वन्य प्रेमींनी जखमी चितळाला वन कर्मचाऱ्यांचे सुपूर्द करून जीवदान दिल्याने मानवतेचा परिचय दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


0 टिप्पण्या