Ticker

6/recent/ticker-posts

वसमतच्या स्वांतत्र सेनानी क्रांतीकारक नरहर करुंदकर हॉल मधे खुले आम मिलन कल्याण मुंबई नावाचा मटका च्या जुगाराचा अड्डा सुरू


मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत शहरातील न्यायालयाच्या समोर न. प. चे नरहर कुरूंदकर सभागृह बंद अवस्थेत असुन त्याचा गैरफायदा घेत शहरातील अवैध धंदा चालकाने सरकारी जागेत क्रांतीकारकाच्या नावाने असलेल्या सभागृहाच्या जागेत च जुगाराचे भव्य दुकाण थाटून रेकार्ड ब्रेक कार्यक्रम केला आहे. 
 स्व. नरहर कुरूंदकर हे शैक्षणीक क्षेत्रातील व हैद्राबाद मुक्ती संग्रामातील अग्रगण्य आदर्श व्यक्तीमत्व असुन त्यांच्या नावाने असलेल्या सभागृहात खुले आम जुगाराचा अवैध धंदा सुरू करणाऱ्याला त्याला सहकार्य करणाऱ्या सरकारी ,राजकीय पूढाऱ्याला जनाची नाही तर मनाची .... वाटायला पाहीजे . पैस्या पूढे या लोकांना नैतिकत्तेचे भान राहीलेले नाही .   अशी अवस्था  झाली आहे . या मुळे तरूण 'पिढी बिघडत असुन गोर गरीब मजुरी करणाऱ्या जुगारी लोकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. त्यामूळे न. प. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सदरील लाजीरवाना प्रकार बंद करूण किमान सरकारी इमारतीत चालणारे तरी अवैध धंदे बंद करण्याचे सौजन्य दाखवावे . 
अवैध धंदे बंद करण्याबाबतच्या बातम्या वेळोवेळी प्रसिध्द करूणही  प्रशासन , विद्यमान आमदार ,विविध पक्षाचे राजकीय पुढारी काहीच हरकत घेत नाहीत . नैतीक बाबीना प्राधान्य न देता अनैतीक बाबीना प्राधान्य देत असल्याची जनतेत चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या