प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे प्रयत्न सार्थकी
सभागृह, सौंदरीकरण, नाली व आवारभिंत कामाचा समावेश
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा - काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये लेखाशीर्ष २५१५, १२३८ अंतर्गत लाखांदूर तालुक्यातील १८ गावांत १ कोटी ५७ लक्ष रुपयाची सभागृह बांधकाम, सौंदरीकरण, नाली बांधकाम , आवारभिंत बांधकाम , वाचनालय, इत्यादी विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यात मानेगाव येथे ढीवर समाजाच्या जागेजवळ सभागृह १० लाख , मासळ येथे बौद्ध विहाराजवळ सौंदरीकरण १० लाख, डांबेविरली येथे बौद्ध विहराजवळ सभागृह १० लाख , दिघोरी / मोठी येथे बौद्ध विहराजवळ सभागृह १० लाख , पुयार येथे बौद्ध विहराजवळ सभागृह १० लाख , हरदोली येथे बौद्ध विहराजवळ सभागृह १० लाख , विरली /खुर्द येथे बौद्ध विहराजवळ सभागृह बांधकाम ५ लाख , विरली/बुज येथे बौद्ध विहराजवळ सभागृह ५ लाख, टेंभरी /विहिरगाव येथे गाव अंतर्गत नाली बांधकाम ७ लाख , करांडला येथे हनुमान मंदीराजवळ आवारभिंत बांधकाम १० लाख , बारव्हा येथे बौद्ध विहराजवळ सभागृह बांधकाम १० लाख , पारडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ वाचनालय बांधकाम १० लाख , इंदोरा येथे सती माता मंदिराजवळ सभागृह बांधकाम ५ लाख , मांढळ येथे शिव मंदिराजवळ सभागृह बांधकाम ५ लाख , लाखांदूर वार्ड नंबर १० मध्ये बौद्ध विहराजवळ सभागृह बांधकाम १० लाख , चीचोली येथे बौद्ध विहाराजवळ सभागृह बांधकाम १० लाख , पाऊणगाव येथे गावअंतर्गत सभागृह बांधकाम व सौदरिकरण १० लाख , बोथली येथे ग्रामपंचायत भवणाजवळ सभागृह बांधकाम १० लाख इत्यादी विकास कामांचा समावेश आहे.


0 टिप्पण्या