पनवेल मध्ये आजद समाज पार्टी व इतर सामाजिक संघटनेने वाहिली आदरांजली !!!
28/6/2024 रोजी लातूर कस्तुरबा वसतिगृहातील सायलीun. गायकवाड हिचा मृत्यू.
6/7/2024 अक्षता म्हात्रे बेलापूर नवी मुंबई,शिळ फाटा येथील गणेशघळ मंदिरतील तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने महिलेसोबत बलात्कार करून महिलेला मारून मृतदेह जंगलात फेकला.
27/7/2024 उरण येथे राहणारी 22 वर्षीय यशश्री शिंदे हीचे अतिशय विकृत पने शरीराचे अवयव कापून हत्या.
1/8/2024 रोजी मुंबई शिवडी येथे पाच वर्षाच्या चिमुकलीवर 30 वर्षाच्या नराधमाने बलात्कार .
कोलकत्ता येथे झालेले मोमीता देवनाथ यांचा झालेला विकृतपणे बलात्कार त्यानंतर विकृतपणे मारून टाकण्यात आले.
बदलापूर येथे चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर झालेला लैंगिक अत्याचार त्यातील एक जीवनाशी गेली.
पंकज खरे रायगड
रायगड :-महाराष्ट्रात वर्ष भरात एका नंतर एक असे अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत माणूस म्हणून प्रत्यक्षात निषेध नोंदवण्यासही माणसाला लाज वाटावी असे माणुसकीला काळीमा फासणारे एकानंतर एक घडलेले गुन्हे हे दर्शविते की दिवसेंदिवस विकृतीचे प्रमाण किती वाढत चालले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे या घटनांमधून दिसून येते.
शिक्षक हे विद्यार्थी रूपात देशाचे भविष्य घडवणारे असतात असे आपण मानतो पण याच शिक्षकांनी वस्तीगृहातील लेकरांची निर्घृणपने हत्या करावी एवढी विकृती❓ शिक्षकच असे भक्षक बनले तर पालकांनी आपल्या लेकरांना शिक्षणासाठी स्वतःपासून दूर वसतीगृहात पाठवावे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. मंदिरे, विद्यालये एवढेच काय तर घराच्या आसपास असलेले परिसर सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत. शिळफाटा येथील गणेश घड मंदिरात महिलेवर तीन पुजारी नराधमांनी आळीपाळीने बलात्कार करून तिला मारून त्याचा मृतदेह जंगलात फेकला. उरण येथील बावीस वर्षीय यशश्री शिंदे हिचे अत्यंत विकृतपणे शरीराचे अवयव कापून दगडाने तोंड ठेचून हत्या करण्यात आली एवढेच काय तर 1/8/2024 रोजी मुंबईमधील शिवडीत पाच वर्षाच्या चिमुकली बरोबर तीस वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला, डोंबिवली तील 10 वर्षाच्या निरपराध मूलाला मारून फेकून दिले. कोलकत्ता येथे झालेले मोमीता देवनाथ यांचा झालेला बलात्कार त्यानंतर विकृतपणे मारून टाकण्यात आले.बदलापूर येथे चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर झालेला लैंगिक अत्याचार त्यातील एक लैंगिक अत्याचार सहन न झाल्यामुळे मरण पावली. या आणि अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांवरून महिलाच काय पण नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो. देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म महिला आहेत, D.G.P. रश्मी शुक्ला महिला आहेत आणि असे असताना महाराष्ट्रात महिलावर एवढे अत्याचार होतात ही बाब अतिशय अशोभनीय आहे. राज्यात अनेक ठिकाणी घरगूती हिंसाचाराला ही रोज महिला बळी पडत आहेत, पोलिस सुद्धा तात्काळ गुन्हा नोंदवून घेत नाहीत त्यामूळे महिलांच्या हत्येचं आणि आत्महत्येचही प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही हे या घटनांवरून निष्कर्ष निघतो. इथून पुढे गुन्हेगारांना चपराक बसेल अशी भूमिका आपल्याकडून अपेक्षित आहे. लहान-मोठ्या, किरकोळ-गंभीर घटनांचा आजाद समाज पार्टी आणि इतर पक्ष संघटना पाठपुरावा घेत राहील. आणि अशा प्रकारच्या विकृत प्रकारच्या आणि गंभीर घटना घडल्यास आजाद समाज पार्टी आणि भीम आर्मी गप्प बसणार नाही देशभरात ठिकठिकाणी आंदोलन घेतली जातील याची कृपया आपण नोंद घ्यावी..
महाराष्ट्र महिला अध्यक्ष नेहा ताई शिंदे महाराष्ट्र महिला महासचिव करून सोनवणे महाराष्ट्र महिला सचिव उषा अहिरे आजाद समाज पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड महासचिव रायगड जिल्हाध्यक्ष अभिजीत आहिरे, पनवेल तालुका युवा अध्यक्ष मनोज सिंग खारघर महासचिव साजिद शेख हे कार्यकर्ते
उपस्थित होते.


0 टिप्पण्या