Ticker

6/recent/ticker-posts

निसर्गरम्य शिवणीबांध जलाशय "ओव्हरफ्लो"


रवी भोंगाने साकोली
साकोली : दरवर्षी संततधार पावसाळ्यामुळे साकोली पासून ०९ कि.मी. असलेला निसर्गरम्य शिवणीबांध जलाशय रविवार सायं. ४ दरम्यान ओव्हरफ्लो झाला. विशाल जलाशयातून वाहणारे पाणी, त्यात आंघोळ करणारी मुली मुले, त्यामुळे त्यांचा आनंद सुट्टीच्या दिवशी रविवारी गगनात मावेनासा झाला होता. अथांग शिवणीबांध जलाशय हा जिल्ह्यातील जलतरण तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी काही दिवस संततधार पावसामुळे हा जलाशय ओव्हरफ्लो होतो. मागील संततधार पावसामुळे येथील पाण्याची पातळी उंचावली होती. आणि आता ३ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अखेर रविवारी ता. २५ ला सायंकाळी ४ वाजता शिवणीबांध जलाशयातून पश्चिमेकडे पाणी विसर्ग व्हायला सुरुवात झाली. याचा आनंद लुटण्यासाठी साकोली पासून दूचाकीने युवक युवतींचा जत्था शिवणीबांधकडे वळला. या स्थळी वाहतूक विस्कळित होऊ नये करीता साकोली पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारण हा ओव्हरफ्लो किती दिवस राहिल हे  सुरू असलेल्या पावसावर अवलंबून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या