मुरमाडी /सावरी येथील घटना
लाखनी पोलिसात अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- भाडेकरूला ३-४ इसम मारहाण करीत असल्याने झालेले भांडण सोडविल्यानंतर त्याच ३ ते ४ इसमांनी घरमालकाला बेदम थापड भुक्क्यानी मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. १०) ला रात्री ८.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली. उमेश प्रकाश पडोळे वय२८ वर्षे रा. मुरमाडी /सावरी असे जखमीचे नाव असून या प्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा लाखनी पोलीस तपास करीत आहेत.
उमेश पडोळे हे मुरमाडी / सावरी येथील रहिवासी असून त्यांच्या घरी असलेल्या भाडेकरूला ३-४ अनोळखी इसम मारत असल्याचे दिसले. तेव्हा मध्यस्ती करत उमेशने होत असलेले भांडण सोडविले दरम्यान आरोपींनी संगनमत करून नाकाला मार लागला असल्याचे सांगून उपचारासाठी दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून राष्ट्रीय महामार्गावरील भगवान धाब्यासमोर शिवणकर पोल्ट्री फार्म जवळ नेवून शिवीगाळ करुन थापडभुक्क्यानी मारपीठ व ढकलडुकल करुन गाडीच्या चाबीने फिर्यादीचे डोक्याला, मानेवर, पाठीवर मारुन जखमी केले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत प्रणय प्रकाश नान्हे (२१), रोहित किशोर धांडे (२१), मुकुल राजेश नान्हे (१९) सर्व रा. सावरी यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असून प्रणय नान्हे हा पसार आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे करीत आहेत.


0 टिप्पण्या