Ticker

6/recent/ticker-posts

रांका अल्पसंख्यांक सेलची आढावा बैठक

कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
 भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अश्पाक पटेल यांच्या उपस्थितीत लाखनी तालुका अल्पसंख्याक सेलची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीत जिल्हाध्यक्ष मोहम्मद अशपाक पटेल यांनी लाखनी तालुकास्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीला अफसर अली, नजीर हुसेन, नौशाद सय्यद, फिरोज शेख, इम्रान खान, जावेद शेख, अक्रम सय्यद, मतीन शेख, नौशाद हुसेन, छोटू खान, एजाज शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या