भंडारा :-सामाजिक कार्यकर्ति, समर्पित व आपल्या गाव ,परिसराचे महिलांच्या कल्याणकरिता झटणारी व सक्रिय 67 वर्षीय गंगाबाई पुसाम यांचे नुकतेच निधन झाले. अनेक वर्षांपूर्वी जुना अंबागड गावात रस्ते ,पाणी ,वीज इत्यादींच्या समस्या होत्या त्यांनी पुढे येऊन या सर्व समस्या मार्गी लावण्याकरिता प्रयत्न केले. महिलांच्या कल्याण व विकास करिता समर्पित भाव ने गट बनवून त्यांना लोन मंजूर करून त्यांचे
सक्षमीकरण केले.महिलांनी बकरीपालन करून आपली आर्थिक उन्नती साधली. या क्षेत्राशी परिचित , सामा कार्यकर्ते सईद शेख यांनी ही त्यांना आपल्या ग्राम विकास समिती चे सहकार्याने त्यांची मदत केली. गंगाबाई ने आपल्या गावात दारूबंदी,स्वच्छता मोहीम,जागतिक महिला दिना चे आयोजन केले. घरचे कामे, असो किंवा शेतातील असो ग्राम_पंचायत ,पंचायत समिती तुमसर,तहसील चे तथा भंडारा मा. सहाय्यक आयुक्त ट्रस्ट कार्यालय कडे कामा निमित्त जात असे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ग्राम विकास समिती अंबागड द्वारा क्षेत्रात आदिवासी गाव विकास, अंबागड किल्ला, बंदरझिरा दर्गा व शेतकऱ्या चे मार्गदर्शन इत्यादी बाबत पत्र पाठवून कौतुक केले होते. यामध्ये गंगाबाईचा ही योगदान होता, जेव्हा प्रथम दा राजे वीरेंद्र शहाबाखतबुलंद किल्ल्याच्या निरीक्षण करिता आले होते तेव्हा त्यांनी गंगुबाई यास मिळण्याची इच्छा व्यक्त केली होती. गंगाबाईच्या कार्याने प्रभावित होऊन भंडारा जिल्हा परिषद च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माजी जिल्हाधिकारी भंडारा सौ माधवी खोडे यांनी सुद्धा गावाला भेट देऊन त्यांची मुलाखत घेतली होती. गावाला लागून अंबागड किल्ला असून येथे त्यांचे वंशज ठाणसिंग, मानसिंग यांनी सुरक्षा रक्षक म्हणून त्याकाळी काम केले होते. याच गावातील त्यांचे नात्यातील सुमी बाई मडावीने पट्टेदार वाघाशी झुंजी घेतली होती. यांचे सासरे बकाराम पुसाम हे पण सुद्धा सक्रीय व्यक्तिमत्व होते 80 _90 च्या आयुष्यामध्ये हे जुना अंबागड पासून तर तुमसर पर्यंत सायकलने कधी आमदार शी भेटायला तर कधी तहसील कार्यालय तुमसर येथे जाणे-येणे करीत असत. गंगाबाई पुसांम चे निधनानंतर या आदिवासी परिसरातील महिलांची एक मसीहा म्हणून हरपली आहे.


0 टिप्पण्या