पोहरा येथील प्रकार, साहित्याचा अल्प वापर
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे फलनिष्पत्ती होत नाही. याचा प्रत्यय दलीतवस्ती पोहरा, तालुका लाखनी येथे आला. १५वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर मधून तयार करण्यात आलेल्या झाकणासह सिमेंट काँक्रिट नाली बांधकामात साहित्याचा अत्यल्प वापर करण्यात आल्याने बांधकाम निकृष्ट झाल्याची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायत पोहरा प्रभाग क्रमांक १ येथील दलीत वस्तीतील जयसिंग कान्हेकर यांचे घरापासून ते चरण कान्हेकर यांचे घरापर्यंत १५ ते २० वर्ष पूर्वी खुली सिमेंट काँक्रिट नाली तयार करण्यात आली होती. त्यातून सांडपाण्याची निकासी होत असे. ग्रामपंचायतीने देखभाल दुरुस्ती केली नसल्यामुळे या नालीस ठिकठिकाणी तडे गेले होते. तसेच योग्य रीतीने सांडपाणी निकासी होत नसल्यामुळे दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे प्रभाग क्रमांक १ मधील ग्रामस्थांचे मागणीवरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १५वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर अंतर्गत ३ लक्ष ५० हजार रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या सिमेंट काँक्रिट नाली झाकणासह बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली. करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने असून यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम पंचायत समिती लाखनी येथील शाखा अभियंता डी.जी. राघोर्ते यांचेकडे सोपविण्यात आले आहे.
करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने असला तरी टक्केवारीने हे सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम झाकणासह ग्रामपंचायतीचे एका पदाधिकाऱ्याला देण्यात आल्याचे समजते. अंदाजपत्रकात दर्शविल्या प्रमाणे साहित्याचा वापर न करता अत्यल्प प्रमाणात साहित्य वापर केल्याने सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम झाकणासह निकृष्ट प्रतीचे झाले असल्याची ओरड होत आहे. क्वालिटी कंट्रोल विभागाने या बांधकामाची चौकशी करून सत्यता समोर आणणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या