Ticker

6/recent/ticker-posts

विस्तार अधिकाऱ्याअभावी पंचायत विभागाची घडी विस्कटली

• पंचायत समिती लाखनी येथील प्रकार

• विस्तार अधिकाऱ्याचे पद भरणे आवश्यक


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी  येथील पंचायत समितीचा कणा असलेल्या पंचायत विभागातील एका विस्तार अधिकाऱ्याचे इतरत्र स्थानांतरण करण्यात आले. तर दुसरे विस्तार अधिकारी आजारी रजेवर गेले तर याच विभागातील वरिष्ठ साहाय्यकास कार्यालयीन काम करण्यास वरिष्ठांनी मनाई केली असून या तिन्ही पदाचा अतिरिक्त कार्यभार इतरांकडे देण्यात आला असल्यामुळे या विभागाची घडी विस्कटली असल्यामुळे जनतेची कमी वेळेवर होत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा समिर कुर्तकोटी यांनी यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष घालून विस्तार अधिकारी पंचायत ची रिक्त जागा भरणे गरजेचे झाले आहे. 
                          पंचायत समिती कार्यालयात पंचायत विभागाला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे "रीड की हड्डी" समले जाते. पंचायत समिती लाखनी येथे या विभागात २ विस्तार अधिकारी, १ वरिष्ठ सहाय्यक व १ कनिष्ठ लिपिक अशी ४ पदे मंजूर आहेत. या विभागाव्दारे १५वा वित्त आयोग, दलीत वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामावर सनियंत्रण तथा पंचायत समितीला प्राप्त तक्रारींची चौकशी करण्याचे काम पंचायत विस्तार अधिकाऱ्यांकडे असते. या शिवाय समाजकल्याण विभागाचे इयत्ता ५वी ते १२वी पर्यंत २ किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना २ चाकी सायकल, वृद्ध कलाकारांना मानधन योजना, महिलांना स्वयं रोजगारासाठी शिवण यंत्र, मत्स्य व्यवसायिकांना मासेमारी करण्यासाठी नायलॉन जाळे, दिव्यांगांना मुख्य सामाजिक प्रवाहात येण्याकरिता व्यवसायासाठी आर्थिक मदत. तसेच शेतकऱ्यांना ताडपत्री इत्यादी योजना चालविला जातात. 
                           पंचायत समिती लाखनी येथील पंचायत विभागात विस्तार अधिकारी प्रमोद हुमने, प्रदीप लांजेवार, वरिष्ठ सहाय्यक नवनीत गोल्हर, कनिष्ठ सहाय्यक सचिन शहारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या पैकी प्रमोद हुमने यांचं पंचायत समिती भंडारा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. तर दुसरे विस्तार अधिकारी लांजेवार प्रकृती अस्वास्थेमुळे आजारी रजेवर आहेत. तर वरिष्ठ सहाय्यक यांचा पदभार काढण्यात आला असून त्यांचेकडे कोणत्याही टेबल चे काम ठेवण्यात आले नाही. पंचायत विस्तार अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार विस्तार अधिकारी कृषी व विस्तार अधिकारी संख्यांकिकी यांचेकडे सोपविण्यात आला आहे. तर वरिष्ठ सहाय्यकाचाही अतिरिक्त प्रभार इतरत्र सोपविण्यात आला आहे. या विभागात नियमित अधिकारी व कर्मचारी नसल्याने घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे पंचायत विभागामार्फत चालविला जाणाऱ्या योजनांचे योग्य रीतीने अंमलबजावणी केली जात नाही. ग्रामस्थांच्या तक्रारींचे वेळीच निवारण होत नाही. तर ग्रामीण परिसरातून कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांची अनेकदा चकरा मारूनही कामे होत नसल्यामुळे अकारण वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. 
                          स्वातंत्र्यदिनानंतर ग्राम स्वच्छता अभियान तसेच अमृत वृक्ष आपल्या दरी योजनेअंतर्गत १ पेड मां के नाम वृक्षारोपण हा उपक्रम राबवायचा आहे. पण पंचायत विभागात मनुष्यबळ कमी असल्यामुळे शासकीय योजना व उपक्रम राबविणे अडचणीचे ठरणार आहे. या करिता भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून पंचायत समिती लाखनीचे पंचायत विभागात रिक्त विस्तार अधिकारी पदावर नेमणूक करण्यात यावी. तसेच वरिष्ठ सहाय्यक नवनीत गोल्हर यांना कार्यालयीन कामकाजापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्यातरी कार्यासनावर देण्यात यावे. तथा पंचायत विभागाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या