• आमदार राजू कारेमोरे यांचा स्तुप्त्य उपक्रम
कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
भंडारा :- तुमसर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजू माणिकराव कारेमोरे व मित्र परिवारामार्फत तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात ३१ ठिकाणी महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत स्व. नामदेवजी भडगे मंगल कार्यालय करडी, परमात्मा एक सभागृह मोहाडी या शिवाय सिहोरा येथे निःशुल्क महाआरोग्य व पोषण रोगनिदान शिबिर पार पडले. या शिबिरात ४ हजार २०० नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली असून दृष्टीदोष असणाऱ्या १ हजार ५२० चष्म्याचे निःशुल्क वितरण करण्यात आले. या शिवाय ६४६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून यात येणार असून ८० दृष्टीदोष असणाऱ्यांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे. त्या पैकी ६ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून आमदार राजू माणिकराव कारेमोरे आणि मित्र परिवाराकडून शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आलेल्या सर्व रुग्णांची माहिती घेण्यासाठी तसेच रुग्णांना रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत करण्यात येणाऱ्या उपचाराबाबद माहिती करिता आमदार राजू कारेमोरे यांचे संकल्पनेतून सर्व रुग्णांना प्रत्यक्ष भेटून रूग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती वेळोवेळी घेतली जात आहे. काही उणीवा असल्यास त्यांचे पूर्ततेकडे विशेषत्वाने लक्ष पुरविण्यात येते.


0 टिप्पण्या