भंडारा: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्ष(1924_2024) पूर्ण होवून शताब्दी समारंभ अंतर्गत आयोजित माजी विद्यार्थी गौरव मेळाव्याचा भव्य_दिव्य उद्घाटन सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेने समाजासाठी उत्तम काम उभे करणाऱ्या असे निवडक 100 कतृत्व्यवान मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित केंद्रीय परिवहन व महामार्ग विकासमंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे उपस्थितीत सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान केल्याबद्दल मो.सईद शेख यांचा गौरवचिन्ह देवून सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती मा विकास सिरपुरकर,प्रसिद्ध अभिनेते डॉ.गिरीश ओक यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.या प्रसंगी प्रख्यात न्यूरो सर्जन पद्मश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम,प्रख्यात नेत्र तज्ञ माजी खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे,प्रभारी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र.कुलगुरू डॉ.संजय दुधे,कुलपती डॉ.राजू हिवसे,माजी विद्यार्थी समिती चे अध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर,सचिव डॉ.कल्पना पांडे ई.मान्यवर उपस्थित होते.वसंतराव देशपांडे स्मृती सभाग्रह नागपूर येथे आयोजित या नेत्रदीपक,गौरवास्पद, व ऐतीहासिक सोहळ्याचे तब्बल 19माजी व्हॉईस चान्सलर,सिने, टीवी,सामाजिक,उद्योग,पर्यावरण जगातील देश_विदेशातून आलेले माजी विद्यार्थी,जजेस, मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर, मुले _मुली ई साक्षी होते.सिने अभिनेते सोनू सूद,राजकुमार हिरानी,शाहबाझ खान ज्यांनी या विद्यापीठ अंतर्गत शिक्षण ग्रहण केले होते ,ते काही कारणास्तव येवू शकले नव्हते त्यांनी आपले लाईव्ह संदेश ,शुभेच्छां दिल्या. हा सोहळा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरलेला असा होता.


0 टिप्पण्या